Join us
Daily Top 2Weekly Top 5

"आदिपुरुषमध्ये गश्मीर राम असता तर...", चाहत्याच्या प्रश्नावर अभिनेत्याचं स्पष्ट उत्तर, म्हणाला, "तिथे नव्हतो तेच..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2023 13:08 IST

चाहत्याने 'आदिपुरुष'बाबत प्रश्न विचारताच स्पष्टच बोलला गश्मीर महाजनी, म्हणाला...

मराठी चित्रपटसृष्टीतील हँडसम हंक अशी ओळख मिळवलेला अभिनेता म्हणजे गश्मीर महाजनी. अभिनयाबरोबरच गश्मीर त्याच्या फिटनेससाठीही विशेष ओळखला जातो. गश्मीर त्याच्या फिटनसेकडेही विशेष लक्ष देताना दिसतो. मराठीबरोबरच त्याने हिंदी कलाविश्वातही नाव कमावलं आहे. दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकलेल्या गश्मीरचा चाहता वर्गही प्रचंड मोठा आहे. गश्मीर सोशल मीडियावरुन चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो. 

गश्मीर त्याच्या चाहत्यांसाठी अनेकदा इन्स्टाग्रामवर #askme सेशन घेताना दिसतो. नुकत्याच घेतलेल्या सेशनमध्ये गश्मीरला चाहत्याने आदिपुरुषबाबत प्रश्न विचारला. "आज आदिपुरुष पाहिला. सारखं वाटायचं इथे राम हा गश्मीर असता तर भाई फूल कडकच, भाई काहीतरी कर रे, धमाका मांगता है पब्लिक" असं चाहत्याने विचारलं होतं. चाहत्याच्या या प्रश्नाला गश्मीरने अगदी स्पष्ट शब्दांत उत्तर दिलं. गश्मीर म्हणाला, "आपण करू काही चांगलं...तिथे नव्हतो तेच बरं नाही का!"

गश्मीरला चाहत्याने "पृथ्वीवरुन एक गोष्ट नष्ट करायची असेल तर तुम्ही कोणती कराल? ट्वीटर म्हणू नका प्लीज" असंही विचारलं होतं. यावर गश्मीरने "आदिपुरुष" असं उत्तर दिलं होतं. याबरोबरच "कोणत्या अभिनेत्याचा अभिनय तुम्हाला आवडला?" या प्रश्नावर गश्मीरने "आदिपुरुषमधील प्रभासचा अभिनय" असं उत्तर दिलं. 

दरम्यान, गश्मीरने अनेक चित्रपटांत काम केलं आहे. हिंदी मालिका आणि वेब सीरिजमध्येही तो झळकला आहे. 'सरसेनापती हंबीरराव' या ऐतिहासिक चित्रपटात गश्मीर छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज अशा दुहेरी भूमिकेत होता. लवकरच तो पुन्हा छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  

टॅग्स :गश्मिर महाजनीमराठी अभिनेताआदिपुरूषप्रभास