Join us

'खतरो के खिलाडी १४' च्या फायनलमध्ये पोहोचला मराठमोळा गश्मीर महाजनी, चाहत्यांकडून अभिनंदन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2024 13:06 IST

'खतरो के खिलाडी १४' ची फायनल लवकरच होणार असून मराठमोळा अभिनेता गश्मीर महाजनी पोहोचला असून तो अंतिम फेरीत बाजी मारणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे (gashmeer mahajani, khatron ke khiladi14)

'खतरों के खिलाडी' या लोकप्रिय रिॲलिटी शोच्या १४ व्या सीझनची सध्या चांगलीच चर्चा आहे. आता हा शो अंतिम टप्प्यात आला असून या शोला टॉप ३ फायनलिस्ट मिळाले आहेत. आनंदाची गोष्ट म्हणजे या टॉप ३ फायनलिस्टमध्ये मराठमोळ्या गश्मीर महाजनीचा सहभाग आहे. त्यामुळे गश्मीरच्या चाहत्यांचं आणि विशेषतः मराठी प्रेक्षकांचं 'खतरो के खिलाडी १४' मध्ये गश्मीर बाजी मारणार का, याकडे लक्ष असेल.

गश्मीरची या स्पर्धकांसोबत होणार कॉंटे की टक्कर 

मिळालेल्या बातमीनुसार यावर्षी रोहित शेट्टी आणि त्याच्या टीमने 'खतरों के खिलाडी'मध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांसाठी पूर्णपणे वेगळे स्टंट डिझाइन केले होते. अखेर एकएक स्पर्धक बाहेर पडून 'खतरो के खिलाडी १४' मध्ये टॉप 6 स्पर्धक राहिले. शालीन भानोत, अभिनेत्री सुमोना चक्रवर्ती, टायगर श्रॉफची बहीण आणि जॅकी श्रॉफची मुलगी कृष्णा श्रॉफ, गश्मीर महाजनी, निम्रित कौर अहलुवालिया, करणवीर मेहरा हे सहा जण फायनलमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी चर्चेत होते. पण नुकत्याच आलेल्या बातमीनुसार कृष्णा, गश्मीर आणि करणवीर यांचा फायनलमध्ये प्रवेश झालाय. 

गश्मीर महाजनी बिग बॉसची ट्रॉफी जिंकणार?  

'खतरों के खिलाडी १४' चा ट्रॉफी जिंकण्यासाठी गश्मीर महाजनीला कृष्णा श्रॉफ आणि करणवीर मेहरा यांचं आव्हान असेल.  आता या तिघांपैकी या साहसी रिॲलिटी शोची ट्रॉफी कोण जिंकणार हे जाणून घेण्याची चाहत्यांना खूप उत्सुकता आहे. 'खतरों के खिलाडी'च्या फायनलचा रिझल्ट काहीच दिवसांमध्ये समोर येईल. गश्मीरचे चाहते त्यांचा लाडका कलाकार फायनलमध्ये बाजी मारणार का,  याची वाट पाहत आहेत.

टॅग्स :गश्मिर महाजनीगश्मिर महाजनीखतरों के खिलाडीरोहित शेट्टी