Join us
Daily Top 2Weekly Top 5

'गंदी बात४'मध्ये या अ‍ॅक्ट्रेसने दिलेत न्यूड सीन, यापूर्वी इंटिमेट सीन्समुळे तिचा तुटला होता साखरपुडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2020 10:55 IST

एका मालिकेत इंटिमेट सीन दिल्यामुळे या अभिनेत्रीचा साखरपुडा मोडला होता.

टेलिव्हिजनची क्वीन एकता कपूरची नुकतीच प्रदर्शित झालेली वेबसीरिज गंदी बात४ मध्ये अभिनेत्री गरिमा जैन काम करते आहे. या सीरिजमध्ये तिने न्यूड व इंटिमेट सीन दिले आहेत. गरिमाने जेव्हा या वेबसीरिजमध्ये काम करण्यासाठी होकार दिला त्यावेळी तिने एक अट ठेवली होती. तिने बोल्ड सीन करताना काही मर्यादा ठेवल्या होत्या. तिने या सीरिजमध्ये न्यूड सीन देताना कसे मॅनेज केलं हे एका मुलाखतीत सांगितलं आहे.

गंदी बातच्या चौथ्या सीझनमध्ये भूमिका करताना काही गोष्टींशी गरिमाला प्रॉब्लेम होता. गरिमाने स्पॉट बॉयला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, मला फ्रंट साईड न्यूड सीन देण्यामध्ये प्रॉब्लेम होता. मी जरापण कम्फर्टेबल नव्हते. याबद्दल मी बालाजीच्या निर्मात्यांशी बोलले. त्यांनी माझ्या गोष्टी समजून घेतल्या व मला सपोर्ट दिला. मी खूश आहे की मला ही संधी मिळाली.

गरिमाने सांगितलं की सेटवर स्वतःला कसे कम्फर्टेबल केलं, शूटिंगदरम्यान सेटवर खूप कमी लोक आजूबाजूला रहात होते. जास्त करून गरीमाच्या आजूबाजूला महिला होत्या.

अभिनेत्री गरिमा जैनने बऱ्याच मालिकेत काम केले आहे. छोट्या पडद्यावरील मालिका शक्ती अस्तित्व के एहसास कीमधून ती घराघरात पोहचली. गरिमाने २०१५ साली दोस्ती यारिया मनमर्जिया या मालिकेतून करियरची सुरूवात केली होती.

गरिमा काही दिवसांपूर्वी साखरपुडा तुटल्यामुळे चर्चेत आली होती. तिने एका मालिकेत इंटिमेट सीन्स दिले होते. या इंटिमेट सीन्समुळे गरिमाचा भावी पती राहुल सराफ याने चक्क साखरपुडा तोडला. 

टॅग्स :एकता कपूर