Join us

'रामायण'च्या सेटवरुन रणबीर - साई पल्लवीचा लूक व्हायरल, श्रीराम-सीतेच्या भूमिकेत प्रभावी वावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2024 13:45 IST

'रामायण' चित्रपटाच्या सेटवरुन श्रीराम - सीतेच्या भूमिकेतील रणबीर - साई पल्लवीचा लूक व्हायरल झालाय. क्लिक करुन तुम्हीही बघा (ramayana, sai pallavi, ranbir kapoor)

नितेश तिवारींच्या 'रामायण' सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे.  'रामायण' सिनेमाची गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चा आहे. काही दिवसांपुर्वी सिनेमाच्या सेटवरुन अरुण गोविल यांच्या राजा दशरथाच्या भूमिकेतील लूक प्रसिद्ध झाला. याशिवाय लारा दत्ता - शिबा चढ्ढा यांचाही लूक लीक झाला. अशातच आता 'रामायण'च्या सेटवरुन रणबीर - साई पल्लवीचा लूक समोर आलाय. दोघांचाही कमाल वावर दिसतोय. 

'रामायण' सिनेमातील रणबीर - साईचा लूक समोर आलाय. फोटोत पाहायला मिळेल की रणबीरने सिनेमासाठी केस वाढवलेले दिसत आहेत. त्याने उपरणं परिधान केलं आहे. याशिवाय सीतेच्या भूमिकेत साई पल्लवी सुद्धा उत्कृष्ट अभिनय करताना दिसतंय. रणबीर - साईने परिधान केलेले कपडे एकमेकांना साजेसे आहेत. श्रीराम - सीतेच्या भूमिकेत दोघांना पाहणं ही एक पर्वणी म्हणता येईल.

अशाप्रकारे 'रामायण' चित्रपटातून स्टार्सचे लूक समोर येत राहिले तर निर्मात्यांसाठी ही चिंतेची बाब ठरणार आहे. काही दिवसांपुर्वी नितिश तिवारींनी 'रामायण' सिनेमाच्या सेटवरुन फोटो व्हायरल झाल्यावर सिनेमावर मोबाईलला कडक बंदी  घालण्यात आली होती. 'रामायण' सिनेमाबद्दल सांगायचं तर... सिनेमात रणबीर, साई पल्लवी याशिवाय लारा दत्ता, अरुण गोविल प्रमुख भूमिकेत आहेत. साऊथमधील यश आणि विजय सेतुपतीसुद्धा सिनेमात झळकणार आहेत. या वर्षीच्या अखेरीस हा सिनेमा रिलीज होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :रामायणरणबीर कपूरसाई पल्लवीयशलारा दत्ता