Join us
Daily Top 2Weekly Top 5

ही दोस्ती तुटायची नाय…. मृण्मयी देशपांडेने शेअर केला खास मित्रांसोबतचा सेल्फी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2019 15:15 IST

या सेल्फीमध्ये मृण्मयीसह अभिनेत्री पूजा सावंत, अभिनेता वैभव तत्त्ववादी आणि गश्मीर महाजन पाहायला मिळत आहेत.

कोणत्याही भूमिकेला न्याय देण्याचे कसब मराठमोळी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिच्याकडे आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. आजवर बऱ्याच आव्हानात्मक भूमिका तिने आपल्या सहजसुंदर अभिनयाने गाजवल्या आहेत. या भूमिकांमुळे तिने रसिकांची मने जिंकली आहेत. मृण्मयी सोशल मीडियावरही बरीच अॅक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या फॅन्सशी संवाद साधते. सोशल मीडियावर ती फोटोही आपल्या फॅन्ससह शेअर करत असते. तिचा असाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. मृण्मयीने आपल्या काही मित्रांसोबतचा सेल्फी शेअर केला आहे. या सेल्फीमध्ये मृण्मयीसह अभिनेत्री पूजा सावंत, अभिनेता वैभव तत्त्ववादी आणि गश्मीर महाजन पाहायला मिळत आहेत. या मित्रांनी एकत्र बरीच धम्माल केल्याचे दिसत आहे. तसंच सिद्धार्थ चांदेकर, मिताली मयेकर, स्वप्नील राव, भूषण प्रधान यांना मिस करत असल्याचे कॅप्शन मृण्मयीने या फोटोला दिले आहे.

त्यामुळे या सगळ्या कलाकारांची मैत्री घट्ट असल्याचे या फोटोवरून दिसून येत आहे. या सेल्फीवर मृण्मयीच्या फॅन्सकडून कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे. या ग्लॅमरस फोटोसह मृण्मयी विविध फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. याआधीही तिने आपल्या सोज्वळ अंदाजाने रसिकांना घायाळ केले आहे. विशेष म्हणजे तिची 'फर्जंद' सिनेमातील भूमिका विशेष लक्षवेधी ठरली होती. या सिनेमात मृण्मयीने केसर नावाच्या कलावंतीणीची भूमिका साकारली होती.

या भूमिकेसाठी तिने बरीच मेहनत घेतली होती. मृण्मयीने त्यासाठी १५ दिवस दररोज चार तास तलवारबाजीचा सराव केला होता. याशिवाय कट्यार काळजात घुसली' , नटसम्राट, 'स्लॅमबुक' चित्रपटात मृण्मयीने जबरदस्त परफॉर्मन्स दिला आहे. 'अग्निहोत्र', 'कुंकू' यासारख्या मालिकांमधून घराघरातील रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवले आहे. विविध सिनेमातील अभिनयासह मृण्मयीने दिग्दर्शनाच्या क्षेत्रातही पाऊल ठेवले आहे. 

टॅग्स :मृण्मयी देशपांडेपूजा सावंत