Join us
Daily Top 2Weekly Top 5

'मित्र म्हणाले तिथे तुझा होईल अपमान', म्हणून रिया गेली नाही सुशांतच्या अंतिम संस्काराला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2020 18:56 IST

रिया म्हणाली की, मला सांगितले गेले की त्यांच्या फ्युनरल लिस्टमध्ये माझे नाव नव्हते. इंडस्ट्रीतील बऱ्याच लोकांची नावं होती. मला समजले की मी तिथे जाऊ शकत नाही. कारण माझं त्या यादीत नाव नाही.

सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीवर प्रश्नांचा भडीमारा होतो आहे. सुशांतच्या कुटुंबियांनी तिच्यावर बरेच आरोप केले आहेत. आता रियाने सर्व आरोपांवरील मौन सोडले आहे. आजतकला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की ती सुशांतच्या अंतिम संस्काराला का गेली नाही.

रिया चक्रवर्तीने सांगितले की, सुशांतच्या फ्युनरल यादीत माझे नाव नव्हते, इंडस्ट्रीतल्या बऱ्याच लोकांचे त्यात नाव होते. मला समजले की मी तिथे अजिबात जाऊ शकत नाही. कारण त्या यादीत माझे नाव नाही आणि त्याच्या कुटुंबातील लोक मला पसंत करत नाहीत.

ती पुढे म्हणाली की, मला फ्युनरलला जायचे होते पण माझ्या काही मित्रांनी मला फोन केला आणि एकाने घरी येऊन मला समजावले की, तिथे तू जाऊ शकत नाही. कारण त्या लोकांना तू आवडत नाहीस. तू यादीतदेखील नाही. तूझा अपमान होईल. तूला हकलवून लावतील. तू मानसिक रित्या स्थिर नाही. तू नको येऊ. ही गोष्ट मला सकाळीच समजली होती. मी सकाळपासून वाट पाहत होती की मला कधी समजेल की मी सुशांतला भेटू शकेन. माझ्या दोन मैत्रीणी म्हणाल्या की, तू सुशांतची बॉडी बघणं फार गरजेचं आहे. जेणेकरून मला क्लोजर मिळावं आणि मी सुशांतचा मृत्यू स्वीकार करू शकेन'

रियाने सांगितले की, '१४ जूनच्या दुपारी साधारण २ वाजता मी माझ्या रूममध्ये होते. माझ्यासोबत माझा भाऊही होता. माझ्या एका मैत्रीणीचा फोन आला की, अशाप्रकारच्या अफवा सुरू आहेत. या अफवा लगेच बंद पाडायला सांग. तिला हे नव्हते माहीत की, मी माझ्या घरी परत आले आहे. तेव्हा मला विचार आला की, अशी अफवा कशी असू शकते. १० ते १५ मिनिटाने कुठूनतरी बातमी कन्फर्म झाली होती. मी ढासळले होते. माझ्या काहीच लक्षात येत नव्हतं की, असं कसं होऊ शकतं. मी पूर्णपणे शॉक्ड होते. म्हणून मी त्याच्या घरी गेले नाही'.

टॅग्स :रिया चक्रवर्तीसुशांत सिंग रजपूत