Join us

बॉलिवूडच्या प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफरला मराठी सिनेमाची भुरळ, या कलाकारांच्या आहेत भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2021 15:48 IST

अभिनेता पुष्कर जोग आणि बॉलिवूड अभिनेत्री मंजिरी फडणीस यांची निवड केली आहे. अ'दृश्य' या आगामी मराठी सिनेमात पहिल्यांदाच हे दोघे एकत्र काम करताना बघायला मिळणार आहेत .

हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांना मराठी प्रेमाचं भरतं आले आहे. अनेक दिग्गज बॉलीवूड कलाकारांना मराठी सिनेमा आकर्षित करत आहे. अक्षय कुमार, प्रियांका चोप्रा यासारखे कलाकार मराठी सिनेमा निर्मिती क्षेत्रात उतरले आहेत. आमिर खाननेसुद्धा वेळोवेळी त्याचा मराठी बाणा दाखवला आहे. बॉलिवूडचे सिनेमॅटोग्राफर कबीर लाल देखली मराठी सिनेमाचे दिग्दर्शक करणार आहेत. कबीर लाल यांनी आज पर्यंत 'वेलकम बॅक','परदेस' 'ताल' ,'हम आपके दिल में रेहते है' अशा अनेक बॉलिवूड सिनेमांची  सिनेमॅटोग्राफी केली आहे.

सिनेमात त्यांनी अभिनेता पुष्कर जोग आणि बॉलिवूड अभिनेत्री मंजिरी फडणीस यांची निवड केली आहे. अ'दृश्य' या आगामी मराठी सिनेमात पहिल्यांदाच हे दोघे एकत्र काम करताना बघायला मिळणार आहेत .

 

नुकतेच या सिनेमाच्या शूटिंगलाही सुरुवात झाली आहे. देहरादून येथे सिनेमाची शूटिंग सुरू आहे. नुकतेच पुष्कर जोगनेही त्याच्या आगामी सिनेमाविषयी माहिती चाहत्यांसह शेअर केली आहे. आता रसिक प्रेक्षकांना या फ्रेश जोडीचा रोमँटिक अंदाज बघण्याची उत्सुकता असणार यात शंका नाही.

पुष्कर जोगने जबरदस्त, सत्या, तुक्या तुकविला नाग्या नाचविला यांसारख्या मराठी सिनेमात तसेच हद करदी अपने, वचन दिले तू मला यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. तो बिग बॉस मराठी या कार्यक्रमात देखील सहभागी झाला होता.

बिग बॉसच्या घरात असताना सई लोकुर आणि पुष्कर जोग या जोडीने रसिकांची भरघोस पसंती मिळवली होती. सई लोकूर घरात अनेकदा पुष्करसोबतच वेळ घालवताना दिसायची. ऑनस्क्रीन पसंती मिळवलेली या जोडीने आता डिजीटल दुनियेतही आपल्या अभिनयाने रसिकांची पसंती मिळवली आहे. सई लोकूर ही नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे. सईचा लाइफ पार्टनर कोण असेल, याबद्दलही तिच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता होती. तिर्थदीप रॉय असं सईच्या पतीचं नाव आहे.

टॅग्स :पुष्कर जोगमंजिरी फडणीस