Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन’ सोफिया हयातचा ‘शैतान’ पती अटकेत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 20:00 IST

 बिग बॉसमुळे नावारूपाला आलेल्या सोफिया हयातचे आणि वादाचे नाते खूपच जवळचे आहे. सोफिया हयात ही कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन आहे असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.

 बिग बॉसमुळे नावारूपाला आलेल्या सोफिया हयातचे आणि वादाचे नाते खूपच जवळचे आहे. सोफिया हयात ही कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन आहे असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. रिलेशनशिपमध्ये सहन केलेला विश्वासघात, अत्याचार आणि दहशत यामुळे तिने नन होण्याचा निर्णय घेतला होता. पण काहीच दिवसांत तिने तिचा निर्णय बदलला.  सोफिया नन झाली, त्या काळात ती केवळ पांढऱ्या कपड्यात वावरत असे. पण तिने नंतर शॉर्ट कपडे देखील घालायला सुरुवात केली आणि एवढेच नव्हे तर ती लग्नबंधनातदेखील अडकली.   सोफिया हयातने गतवर्षी एप्रिलमध्ये इंटिरिअर डिझाईनर तिने व्लाड स्टॅनेस्कू या  प्रियकरासोबत लग्न केले.  पण आता पती ब्लादवर तुरुंगाची हवा खातोय.होय, लग्नानंतर काही महिन्यांतचं सोफियाने व्लाडवर अनेक गंभीर आरोप केले होते. व्लाड एक ‘शैतान’ (राक्षस) आहे. तो कर्जात बुडालेला होता. त्याने केवळ पैशांसाठी माझा वापर करून घेतला, असे अनेक आरोप करत तिने व्लाडविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. यानंतर व्लाड फरार झाला होता. पण पोलिसांनी लंडनच्या एका परफ्यूम शॉपममधून त्याला अटक केली. स्पॉट ब्वॉयने याबाबतचे वृत्त दिले आहे. सोफियाने आपल्या तक्रारीत ब्लादवर फसवणुकीचा आरोप केला होता. व्लाडने पैशांसाठी माझ्याशी लग्न केले. त्याने माझी वेडिंग रिंगही विकली. मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, असे तिने म्हटले आहे.लग्नानंतर सोफियाने नव-यासोबतचे काही इंटिमेट व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले होते. यासाठी तिला ट्रोल व्हावे लागले होते. त्याआधी अशाच अनेक कारनाम्यांमुळे तिच्यावर टीका झाली होती.यापूर्वी  सोफियाने  तळव्यांवर  टॅटूचा गोंदवून त्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. तिच्या या फोटोवर लोकांनी चांगल्याच संतप्त प्रतिक्रिया नोंदवल्या होत्या.   स्वस्तिक या चिन्हाचे हिंदू धर्मात धार्मिक महत्त्व आहे. त्यामुळे सोफियाच्या या टॅटवर सुमारे दोनशेवर लोकांनी कमेंट देत तिच्या या कृत्याची निंदा केली होती. काही लोकांनी सोफियाला देशाबाहेर हाकलून देण्याची तर  काहींनी तिला कायदेशीर नोटीस पाठविण्याची धमकी दिली होती.

 

टॅग्स :सोफिया