Join us

‘उरी’ अभिनेता विकी कौशल मुलीसोबत करतोय फ्लर्ट; व्हिडीओ व्हायरल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2019 17:03 IST

त्याच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने त्याने जिंकली. त्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत तो एका मुलीसोबत फ्लर्ट करताना दिसतोय.

उरी’ या हिंदी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती. हा चित्रपट केवळ कथानकामुळे नव्हे तर एका अभिनेत्याच्या अफलातून कामगिरीमुळेही हिट झाला. आता त्या अभिनेत्याचे नाव सांगण्याची खरंतर काही गरज नाही. तो अभिनेता म्हणजे विकी कौशल. त्याच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने त्याने जिंकली. त्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत तो एका मुलीसोबत फ्लर्ट करताना दिसतोय. ‘रेअर फोटो क्लब’ या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला असून क्षणार्धात तो व्हायरल झाला आहे. विकीच्या अ‍ॅक्टींग स्कूलमधला हा व्हिडीओ आहे.

या व्हिडीओतील विकीचा लूक पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. केसांना चपचपीत तेल, तोंड रंगवलेला विकी हैदराबादी लहेजात मुलीशी फ्लर्ट करताना दिसतोय. त्यातही त्याचं अभिनय कौशल्य विशेष लक्ष वेधून घेत आहे.

विकी सध्या तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनला आहे. त्याला ‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. ‘मसान’, ‘उरी’, ‘संजू’, ‘राजी’ या चित्रपटांमधील त्याच्या अभिनयाचं प्रेक्षक-समीक्षकांकडून कौतुक करण्यात आलं.

टॅग्स :विकी कौशलउरी