Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘कालभैरव रहस्य 2’साठी सिद्धांत कर्णिकने पहिल्यांदाच केली ही गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2018 06:00 IST

'कालभैरव रहस्य' मालिकेचा दुसरा सीझन लवकर स्टार भारत वाहिनीवर दाखल होणार आहे.

ठळक मुद्दे ‘कालभैरव रहस्य-2’ मालिकेत यशवर्धनच्या भूमिकेत सिद्धांत कर्णिक

छोट्या पडद्यावरील अभिनेता सिद्धांत कर्णिक स्टार भारत वाहिनीवरील ‘कालभैरव रहस्य-2’ मालिकेत यशवर्धनची भूमिका साकारतो आहे. या भूमिकेसाठी त्याने चित्रीकरणा सुरूवातदेखील केली आहे. नुकतेच त्याने पाण्यात राहून एक प्रसंग पहिल्यांदाच चित्रीत केला आहे. त्याने प्रथमच अशाप्रकारे पाण्यात राहून एक प्रसंग चित्रीत केला असून हा त्याच्यासाठी एक नवीन अनुभव होता.

या प्रसंगामुळे उत्साहित झालेल्या सिद्धांतने सांगितले, “मला पाण्यात राहायला आवडते. पण पाण्यात राहून एखाद्या प्रसंगासाठी संवाद म्हणणे आणि चित्रीकरण करण्याचा हा माझ्या जीवनातील पहिलाच प्रसंग होता. हा अनुभव खूपच मजेशीर आणि उत्साहजनक होता.”

'कालभैरव रहस्य' मालिकेचा दुसरा सीझन लवकर स्टार भारत वाहिनीवर दाखल होणार आहे. पापा बाय चांस मालिकेच्या जागी ही मालिका संध्याकाळी सात वाजता प्रसारीत होणार आहे. 'कालभैरव रहस्य' मालिकेला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर निर्मात्यांनी दुसरा सीझन बनवण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या भागात छवी पांडे, राहुल शर्मा व सरगुन कौर प्रमुख भूमिकेत होते. 'कालभैरव रहस्य'च्या दुसऱ्या सीझनमध्ये मुख्य भूमिकेत गौतम रोडे व अदिती गुप्ता दिसणार आहे. यांच्याव्यतिरिक्त या मालिकेत सिद्धांत कर्णिक, सोनिया सिंग व आयाम मेहता प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. ही मालिका एका मंदिरातील रहस्यावर आधारीत असणार आहे आणि यावेळेस मालिकेत बंगला व त्यात राहणारे कुटुंब आणि त्यांच्या जवळच्या मंदिरावर आधारीत असणार आहे. ही मालिका २७ नोव्हेंबरला रसिकांच्या भेटीला येणार आहे. 'कालभैरव रहस्य' मालिकेच्या दुसऱ्या सीझनची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत आहेत. 

टॅग्स :काल भैरव रहस्य २