Join us
Daily Top 2Weekly Top 5

वयाच्या 60 व्या वर्षी या अभिनेत्रीने पहिल्यांदाच केला धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2020 16:47 IST

नीना गुप्ता यांच्या जीवनातील हे रहस्य कुणालाच माहिती नव्हतं. असाच एक किस्सा स्वतः नीना गुप्ता यांनी सांगितला आहे.

नीना गुप्ता यांचे नाव घेतले की नजरेच्या नजाकतींनी भारलेला सहज अभिनय आणि त्यांचा बोलका चेहरा डोळ्यासमोर येतो. अनेक हिंदी चित्रपटांसोबत इंग्रजी आणि इतर भारतीय भाषिक चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका वठवल्या आहेत. विशेष म्हणजे नीना गुप्ता यांचे लाखोंनी चाहते आहेत. त्यांच्या वैयक्तीक आणि वैवाहिक जीवनाविषयी जाणून घेण्याची रसिकांना उत्सुकता असते. आजपर्यंत त्यांच्या खासगी जीवनाबाबत अनेक धक्कादायक खुलासे जगासमोर आले आहेत. यापैकी एक खुलासा ऐकून तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.

नीना गुप्ता यांच्या जीवनातील हे रहस्य कुणालाच माहिती नव्हतं. असाच एक किस्सा स्वतः नीना गुप्ता यांनी सांगितला आहे. आज माझी खंबीर स्त्री म्हणून ओळख असली तरीदेखील मी सुद्धा कधीकाळी अन्याय सहन केला आहे. माझ्यावरही अत्याचार झाले आहेत. माझ्या एका प्रियकराने माझी फसवणूक केली होती. त्याने माझा खूप छळ केला. शिवीगाळ करत मारहाणही केली”, असं नीना गुप्ता यांनी सांगितलं.

इतकेच नव्हे तर 8० च्या दशकात त्यांनी घेतलेल्या एका निर्णयाची प्रचंड चर्चा झाली. यासाठी त्यांना पराकोटीच्या टीकेला सामोरे जावे लागले. पण स्वतंत्र विचारांच्या नीना जगाची पर्वा न करता आपल्या निर्णयावर ठाम राहिल्या. हा निर्णय होता, वेस्ट इंडियाचा माजी क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्ससोबत लग्न न करता त्याच्या मुलीला जन्म देण्याचा. 8० च्या दशकात हा निर्णय मुळातचं क्रांतिकारी निर्णय होता.

आज वयाच्या 60 वर्षातही नीना गुप्ता खूप फिट आणि फाइन दिसतात. आजही नीना तितक्याच बोल्ड आहेत. 60 ओलांडल्यानंतरही स्वत:चे बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करण्याचे धाडस त्यांच्यात आहेत. माझ्या बोल्ड फोटोवर हजारो कमेंट्स येतात. मी त्या एन्जॉय करते, असे त्या अलीकडे म्हणाल्या होत्या.

टॅग्स :नीना गुप्ता