Join us
Daily Top 2Weekly Top 5

अंगुरी भाभी फेम शुभांगी अत्रे करियरमध्ये पहिल्यांदाच करणार हे काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2018 07:15 IST

आपला खास अंदाज व बहुआयामी व्‍यक्तिमत्‍त्‍वाला सादर करत आहे 'भाबीजी घर पर है'ची अंगूरी भाभी, जी आदर्श पत्‍नीचे प्रतीक आहे. तिच्‍याकडे कूकिंगचे उत्‍तम कौशल्‍य आहे, ज्‍यामुळे तिच्‍याकडे स्‍पेशालिस्‍ट म्‍हणून पाहिले जाते.

समाजाच्‍या सामान्‍य व नेहमीच्‍या रुढींच्‍या माध्‍यमातून नियम स्‍थापित करण्‍यात आलेल्‍या युगामध्‍ये आधुनिक काळातील भारतीयांनी पूर्वी निश्चित करण्‍यात आलेल्‍या परंपरांना मागे टाकत नवीन पाऊल उचलण्‍याचा निर्णय घेतला. व्‍यक्‍तींमध्‍ये विविध पैलू, व्‍यक्तिमत्‍त्‍वे व रुची नेहमीच दिसून येतात. पण नेहमीच्‍या भारतीयांना 'अॅण्‍डडीयन' (&dian) करणारी बाब आहे त्‍यांच्‍या जीवनात विविध गोष्‍टींना प्राप्‍त करण्‍यासाठी त्‍यांचा उत्‍साह व क्षमता. आपल्‍या रोजच्‍या जीवनात अधिक उत्‍साहाची भर करण्‍याचा प्रयत्‍न करणारे ते समाजाच्‍या रुढींप्रमाणे वागण्‍याला नकार देतात. ही तरुण पिढी अभिमानाने त्‍यांची 'खास' बाजू सादर करते. प्रत्‍येक व्‍यक्‍तीमधील या विविध पैलूंचा सन्‍मान आणि 'खास अंदाज'ची प्रशंसा करत &TV त्‍यांची नवीन मोहीम 'है खास हर अंदाज'सह याच साराला दाखवण्‍याचा प्रयत्‍न करते. 

आपला खास अंदाज व बहुआयामी व्‍यक्तिमत्‍त्‍वाला सादर करत आहे 'भाबीजी घर पर है'ची अंगूरी भाभी, जी आदर्श पत्‍नीचे प्रतीक आहे. तिच्‍याकडे कूकिंगचे उत्‍तम कौशल्‍य आहे, ज्‍यामुळे तिच्‍याकडे स्‍पेशालिस्‍ट म्‍हणून पाहिले जाते. पाकपद्धतीमध्‍ये पारंपरिकरित्‍या कुशल असलेल्‍या तिचा उत्‍साह व आनंदी दृष्टिकोन शिकण्‍यामधील ऊर्जा आणि उत्‍साहावर कोणातच परिणाम होऊन देत नाही. सातत्‍याने आपले कौशल्‍य वाढवण्‍याचा प्रयत्‍न करणारी अंगूरी सतत इंग्रजीमध्‍ये बोलण्‍याचा प्रयत्‍न करते आणि त्‍याचवेळी तिच्‍या लाडक्‍या पतीच्‍या गरजांची काळजी घेते. 

'है खास हर अंदाज'बाबत बोलताना शुभांगी अत्रे म्‍हणाली, ''मोहीमेची टॅगलाइन 'है खास हर अंदाज'मध्‍येच तुमच्‍यामधील शक्‍तीची भावना सामावलेली आहे. ही मोहीम आपल्‍यामधील बहुआयामी व्‍यक्तिमत्‍त्‍वाला प्रोत्‍साहित करते. भारतीय समाजाच्‍या नेहमीच प्रीब्राण्‍डेड अपेक्षा असतात आणि या मोहीमेसह मला वाटते की, आपल्‍यामधील अंतर्गत व्‍यक्तिमत्‍त्‍वाला विकसित होण्‍याची संधी देण्‍याचा आमचा हा प्रयत्‍न आहे. आपला समाज खुल्‍या-मनाच्‍या वृत्‍तीच्‍या दिशेने वाटचाल करत असताना विविध आवड व व्‍यक्तिमत्‍त्‍वांच्‍या विचाराला चालना मिळेल. ही मोहीम फक्‍त विविध व्‍यक्तिमत्‍त्‍वांबाबत नाही, तर पुढील दृष्टिकोनाबाबत देखील आहे. तसेच ही मोहीम समुदायाला प्रबळ करण्‍याचा प्रयत्‍न करते. मला विश्‍वास आहे की, ही नवीन मोहीम समाजाच्‍या विचारामध्‍ये बदल घडवून आणेल आणि समाजाला स्‍वत:मध्‍ये अॅण्‍डडीयन निर्माण करण्‍याचे आवाहन करेल.'' 

टॅग्स :भाभीजी घर पर है