Join us
Daily Top 2Weekly Top 5

पाहा, नील नितीन मुकेशची मुलगी नूरवीचा पहिला फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2018 15:37 IST

नील आणि रूक्मिणी यांनी आपल्या मुलीचे ‘नूरवी’ असे नामकरण केले आहे़. आज रविवारी सकाळी रूक्मिणी, नील नूरवीला रूग्णालयातून घरी घेऊन गेले. 

अभिनेता नील नितीन मुकेश अलीकडेचं बाबा बनला. ट्विटरवरून नीलने ही आनंदाची बातमी शेअर केली. गत गुरूवारी दुपारी साडे तीनच्या सुमारस नीलची पत्नी रूक्मिनी सहाय हिने मुंबईच्या ब्रीच कँडी रूग्णालयात एका गोंडस मुलीला जन्म दिला. नील आणि रूक्मिणी यांनी आपल्या मुलीचे ‘नूरवी’ असे नामकरण केले आहे. आज रविवारी सकाळी रूक्मिणी, नील नूरवीला रूग्णालयातून घरी घेऊन गेले. यावेळी नूरवीची एक झलक पाहायला मिळाली.यावेळी नूरवीच्या जन्माचा आनंद नीलच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसला. गत एप्रिल महिन्यात आपण बाबा बनणार असल्याची गोड बातमी नीलने चाहत्यांशी शेअर केली होती. ‘मी आणि रूक्मिनी आयुष्याचा एक नवा टप्पा सुरू करणार आहोत. मी बाबा बनणार आहे. मुलगा असो वा मुलगा याने आम्हाला काहीही फरक पडत नाही. आमच्या घरी नवा पाहुणा येणार हा आनंद खूप मोठा आहे,असे नीलने म्हटले होते.

९ फेबु्रवारी २०१७ रोजी नील आणि रूक्मिणी विवाहबंधनात अडकले होते. राजस्थानच्या उदयपूर येथे नीलचा ग्रँड विवाहसोहळा पार पडला होता़ नीलचे हे अरेंज मॅरेज होते. रूक्मिणी ही नीलच्या आई-वडिलांची पसंती आहे. नील हा सुप्रसिद्ध गायक मुकेश यांचा नातू आहे. नीलचे पापा नितीन मुकेश हेही गायक आहे.

मात्र नीलने आजोबा वा पापाच्या मार्गावर न जाता वेगळी वाट चोखाळली. त्याने अभिनेता बनण्याचा निर्णय घेतला. नील अखेरचा ‘वजीर’ या सिनेमात दिसला होता.

याशिवाय ‘प्रेम रतन धन पायो’,‘आ देखें जरा’,‘शॉर्टकट रोमियो’,‘प्लेअर्स’,‘जॉनी गद्दार’ यासारख्या चित्रपटात तो अभिनय करून चुकला आहे.  नील नितीन मुकेश प्रभासच्या अपोझिट अ‍ॅक्शन करताना दिसणार आहे.  ‘साहो’ या चित्रपटात नीलची भूमिका अतिशय दमदार असणार आहे. ‘बाहुबली’नंतर प्रभासही या चित्रपटात अ‍ॅक्शन अवतारात दिसणार आहे.

टॅग्स :नील नितिन मुकेश