Join us
Daily Top 2Weekly Top 5

आमिर खान व जुही चावला यांच्यात सात वर्षे होता अबोला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2019 10:45 IST

आमिर खान व जुही चावला या दोघांनी अनेक हिट चित्रपटांत काम केले. ‘कयामत से कयामत तक’ पासून ‘इश्क’पर्यंत या जोडीने लोकांना वेड लावले. ‘इश्क’नंतर मात्र ही जोडी कधीच एकत्र दिसली नाही. याचे कारण म्हणजे, दोघांमध्ये निर्माण झालेले मतभेद.

ठळक मुद्देहोय, जुही व आमिर हे दोघे एकमेकांचे खूप चांगले मित्र होते. पण एक वेळ अशी आली की, आमिर व जुही दोघांनीही एकमेकांशी सहा-सात वर्षे अबोला धरला.

आमिर खान व जुही चावला या दोघांनी अनेक हिट चित्रपटांत काम केले. ‘कयामत से कयामत तक’ पासून ‘इश्क’पर्यंत या जोडीने लोकांना वेड लावले. ‘इश्क’नंतर मात्र ही जोडी कधीच एकत्र दिसली नाही. याचे कारण म्हणजे, दोघांमध्ये निर्माण झालेले मतभेद. होय, जुही व आमिर हे दोघे एकमेकांचे खूप चांगले मित्र होते. पण एक वेळ अशी आली की, आमिर व जुही दोघांनीही एकमेकांशी सहा-सात वर्षे अबोला धरला. अलीकडे एका मुलाखतीत खुद्द आमिरने ही माहिती दिली.

‘इश्क’ या चित्रपटाच्या सेटवरचा हा किस्सा. या सेटवर आमिर अनेकदा जुहीची मजा घेत, तिच्यासोबत प्रैंक खेळायचा. आमिरला ही सवयचं होती. आपल्या सहकलाकारांची फजिती करताना त्याला मज्जा यायची. एकदा मला भविष्य कळते, असे म्हणून आमिरने जुहीचा हात पाहायचा म्हणून तिला हात पुढे करायला सांगितले. पण जुहीने जसा हात पुढे केला तसा आमिर तिच्या हातावर थुंकला. या प्रकारानंतर जुही इतकी खवळली की तिने आमिरची बोलणे बंद केले. अर्थात दोघांनीही ‘इश्क’च्या शूटींगवर या वादाचा परिणाम होऊ दिला नाही.

ताज्या मुलाखतीत आमिरही यावर बोलला. ‘इश्क’च्या सेटवर माझ्यात व जुहीत क्षुल्लक वाद झाला होता. यानंतर मी तिच्याशी कधीच न बोलण्याचा निर्णय घेतला. मी तेव्हा असे का वागलो, ते मला आजही कळत नाही. या भांडणातचं आम्ही ‘इश्क’चे शूटींग पूर्ण केले. पुढे सहा-सात वर्षे आमचा अबोला होता. यानंतर सात वर्षांनंतर अचानक एकेदिवशी मला जुहीचा फोन आला. मी तिचा फोन घेणार नाही, हे तिला ठाऊक होते. पण तरिही तिने मला फोन केला. मी फोन घेतला. यानंतर मला तुला भेटायचेय, असे जुही मला म्हणाली. मी व रिना घटस्फोट घेतोय, हे जुहीला कळले होते. यासंदर्भात तिला मला भेटायचे होते. ती मला भेटली. तिने मला खूप समजावले. आमचा संसार वाचवण्यासाठी तिने अनेक प्रयत्न केलेत. आज मी जुही एकमेकांशी फार बोलत नाही. पण आमच्यात अबोला नाही. आमची मैत्री आजही कायम आहे, असे आमिरने सांगितले. 

टॅग्स :आमिर खानजुही चावला