Join us
Daily Top 2Weekly Top 5

शाहिद कपूरचा हा लहानपणीचा फोटो पाहून तुम्ही म्हणाल, झेन आहे त्याची ड्युप्लिकेट कॉपी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2019 13:32 IST

शाहिदने नुकताच त्याचा आणि झेनच्या फोटोचा एक कोलाज इन्स्टाग्रामला शेअर केला आहे आणि त्यासोबत लिहिले आहे की, या दोन फोटोंमध्ये काय फरक आहे हे ओळखा...

ठळक मुद्देदोन्ही फोटोंकडे व्यवस्थितपणे पाहिले तर शाहिद आणि झेन या फोटोत अगदीच सारखे दिसत आहेत. या फोटोवर शाहिदचे चाहते भरभरून कमेंट करत आहेत. शाहिद आणि झेनचा हा फोटो त्यांना प्रचंड आवडत आहे. पण त्याचसोबत बॉलिवूडमधील सेलिब्रेटीदेखील या फोटोवर कमेंट करत आहेत.

शाहिद कपूरचा मुलगा झेन हा त्याची ड्युप्लिकेट कॉपी आहे असेच आता आपल्याला म्हणावे लागेल. कारण शाहिदने सोशल मीडियावर शेअर केलेल्या या फोटोतून हे स्पष्ट होत आहे. शाहिदने नुकताच त्याचा आणि झेनच्या फोटोचा एक कोलाज इन्स्टाग्रामला शेअर केला आहे आणि त्यासोबत लिहिले आहे की, या दोन फोटोंमध्ये काय फरक आहे हे ओळखा... यासोबतच त्याने लाइक फादर लाइक सन असा हॅशटॅग देखील दिला आहे.

झेन आता जितक्या महिन्यांचा आहे, शाहिद देखील जवळपास तितक्याच महिन्याचा असताना त्याचा हा फोटो काढण्यात आलेला आहे. या दोन्ही फोटोंकडे व्यवस्थितपणे पाहिले तर शाहिद आणि झेन या फोटोत अगदीच सारखे दिसत आहेत. या फोटोवर शाहिदचे चाहते भरभरून कमेंट करत आहेत. शाहिद आणि झेनचा हा फोटो त्यांना प्रचंड आवडत आहे. पण त्याचसोबत बॉलिवूडमधील सेलिब्रेटीदेखील या फोटोवर कमेंट करत आहेत. दिग्दर्शक सिद्धार्थ पी मल्होत्राने लिहिले आहे की, हा फोटो पाहाताना ही झेरॉक्स कॉपी आहे का असेच मला वाटते तर शाहिदचा भाऊ इशान खट्टरने तो तुझ्यासारखाच दिसतो असे म्हणत हार्टची इमोजी पोस्ट केली आहे.

झेन सप्टेंबरमध्ये वर्षाचा होणार असून शाहिद आणि मीरा अनेकवेळा त्यांच्या इन्स्टाग्रामद्वारे त्याचे फोटो पोस्ट करत असतात. शाहिद आणि मीरा यांना मिशा ही मोठी मुलगी असून झैन आणि मिशाच्या पहिल्या रक्षाबंधनाचे फोटो नुकतेच मीराने सोशल मीडियावर पोस्ट केले होते. 

शाहिदचे आणि मीराचे लग्न ७ जुलै २०१५ ला झाले होते. एक वर्षानंतर म्हणजेच २६ ऑगस्टला त्यांच्या घरी मिशाचा जन्म झाला. झेन हे त्यांचे दुसरे अपत्य आहे. शाहिद कपूरने झेनच्या जन्मानंतर पालकत्वाची सुट्टी घेतली होती आणि तो जास्तीत जास्त वेळ मुलांसोबत घालवत होता. या सुट्टीमुळेच शाहिद कपूरने त्याच्या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण देखील पुढे ढकलले होते. शाहिदच्या काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या कबीर खान या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. 

टॅग्स :शाहिद कपूरमीरा राजपूत