Join us
Daily Top 2Weekly Top 5

फॅट टू फिट झालेला फरदीन खानचा चार्मिंग लूक, नवीन प्रोफाईल फोटो आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2021 10:55 IST

गेल्या दहा वर्षांमध्ये फरदीन खान एकाही सिनेमात दिसला नव्हता.त्यामुळे त्याची जादूही कमी झाल्याचे पाहायला मिळाले.

गेल्या काही दिवसांपासून अभिनेता फरदीन खान त्याच्या लूकमुळे चर्चेत आहे. पुन्हा एकदा तो पूर्वीसारखा डॅशिंग आणि चार्मिंग दिसू लागला आहे. फरदीन पुन्हा एकदा फॅट टू फिट झाला आहे. स्वतःमध्ये झालेला बदल पाहून कोणीही त्यांच्या डोळ्यांवर विश्वास ठेवू शकत नाही. नुकताच सोशल मीडियावरही त्याने त्याचा नवीन प्रोफाईल फोटो ठेवला आहे. त्याच्या नवीन लूकमधला फोटो पाहून चाहतेही लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. सध्या त्याचा नवीन फोटोही प्रचंड व्हायरल होत आहे. काही वर्षापूर्वीच फरदीन खानचा एक फोटो समोर आला होता. त्याचे अवाढव्य वाढलेले शरिर पाहून कोणीच त्याला ओळखलेही नव्हते. त्यावेळी त्याची फार चर्चा झाली होती. यावरून लोकांनी त्याला ट्रोलही केले होते.

गेल्या दहा वर्षांमध्ये फरदीन एकाही सिनेमात दिसला नव्हता.त्यामुळे फरदीनची जादूही कमी झाल्याचे पाहायला मिळाली. चाहत्यांच्याही तो विस्मृतीत गेला होता.मात्र आता तो पुन्हा कमबॅक करण्याच्या तयारीत आहे.'ब्लास्ट' असे त्याच्या नवीन सिनेमाचे नाव आहे, संजय गुप्ता या सिनेमाचे दिग्दर्शन करत आहे. फरदीन खान व्यतिरिक्त रितेश देशमुख आणि प्रिया बापट देखील 'ब्लास्ट' सिनेमात झळकणार आहेत. वेनेजुएलाची फिल्म रॉक पेपर सिजर्स (2012) मध्ये प्रदर्शित झालेला सिनेमाचा हिंदी रीमेक असणार आहे. रॉक पेपर सिजर्स ला 85 व्या ऑस्कर अवॉर्ड्समध्ये बेस्ड फॉरेन लॅग्वेजसाठी पुरस्कार मिळाला होता.

2000 साली रिलीज झालेल्या ‘जंगल’ या सिनेमाने फरदीनला ओळख दिली. या सिनेमातील फरदीनच्या अभिनयाचे प्रचंड कौतुक झाले होते. 'लव्ह के लिए कुछ भी करेगा', 'ओम जय जगदीश', 'हे बेबी', 'ऑल द बेस्ट', 'प्यार तूने क्या किया' अशा अनेक सिनेमात फरदीनने काम केले होते. त्याचे हे सिनेमे चांगलेच हिट ठरले होते. त्यानंतर तो अचानक बॉलिवूडमधून गायब झाला होता. आता तो पुन्हा कमबॅक करत रसिकांंची मनं जिंकणार का हेच पाहणे रंजक असणार आहे.

टॅग्स :फरदीन खानरितेश देशमुख