Join us
Daily Top 2Weekly Top 5

एकच क्षेत्र तरी २९ वर्ष झाली नाही भेट, भन्नाट आहे अरुणा इराणी- फरिदा जलाल यांचा किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 10:03 IST

Farida jalal and Aruna irani: एकाच क्षेत्रात काम करुनदेखील जवळपास २९ वर्ष या दोघींची एकमेकींशी भेट झाली नव्हती. 'इंडियन आयडॉल'च्या सेटवर या दोघींनी या गोष्टीचा खुलासा केला.

बॉलिवूडमध्ये ६० -७० चं दशक गाजवणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे फरिदा जलाल आणि अरुणा ईराणी.  उत्तम अभिनय कौशल्य आणि साधेपणा यांच्या जोरावर या दोघींनीही तो काळ गाजवला. विशेष म्हणजे एकाच क्षेत्रात काम करुनदेखील जवळपास २९ वर्ष या दोघींची एकमेकींशी भेट झाली नव्हती. 'इंडियन आयडॉल'च्या सेटवर या दोघींनी या गोष्टीचा खुलासा केला.

या कार्यक्रमाच्या सेटवर फरिदा जलाल यांच्या 'तकदीर' या सिनेमातील काही फोटो दाखवण्यात आले. या जुन्या आठवणी पाहून त्यांच्या डोळ्यात पाणी तरळलं. विशेष म्हणजे या सेटवर दोन्ही अभिनेत्री बऱ्याच वर्षानंतर एकत्र आल्यामुळे अरुणा इराणीदेखील थोड्या भावूक झाल्या. 

फरिदा आणि अरुणा यांनी 'बॉबी' सिनेमात एकत्र स्क्रीन शेअर केली होती.  या सिनेमानंतर त्यांच्या भेटीगाठी कमी झाल्या. या दोघींनी अनेक सिनेमांमध्ये सहाय्यक अभिनेत्रीची भूमिका साकारली होती. विशेष म्हणजे दोघींच्याही वाट्याला येणाऱ्या भूमिका या जवळपास सारख्याच असायच्या. त्यामुळे सिनेमांमध्ये एकतर फरिदाला घ्यायचे किंवा मग अरुणाला. त्यामुळे दोघीही एकाच सिनेमात झळकणं फार कठीण होतं. परिणामी, या दोघींनी एकत्र सिनेमा फार कमी केले. दरम्यान, २९ वर्षानंतर या दोघींनी 'ओ रोमियो' या सिनेमात एकत्र काम केलं. त्यापूर्वी त्या एकाही सिनेमात एकत्र झळकल्या नव्हत्या.

English
हिंदी सारांश
Web Title : Aruna Irani and Farida Jalal's surprising reunion after 29 years.

Web Summary : Actresses Farida Jalal and Aruna Irani, despite working in the same industry, hadn't met for 29 years. They revealed this on 'Indian Idol'. Reuniting after years, both became emotional on set, reminiscing about their shared history and careers.
टॅग्स :बॉलिवूडफरिदा जलालअरुणा इराणीइंडियन आयडॉलसेलिब्रिटीसिनेमा