Join us

फरहान अख्तरने लाखो चाहत्यांना दिली 'हार्ट ब्रेकिंग' बातमी, निराश झाले नेटकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2024 14:04 IST

फरहान अख्तरने एक अशी बातमी दिली ज्यामुळे अनेकांना दुःख झालं असेल. काय म्हणाला फरहान बघा

फरहान अख्तर हा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता. फरहानने अनेक सिनेमांमधून अभिनय करत प्रेक्षकांच्या मनात छाप पाडली. फरहानने 'फुकरे', 'मिर्झापूर' अशा कलाकृतींच्या माध्यमातून निर्माता म्हणूनही स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. फरहानने दिग्दर्शित केलेले 'डॉन', 'लक्ष्य', 'दिल चाहता है' सिनेमे आजही लोकांच्या आवडीचे. पण नुकतीच फरहानने एक अशी बातमी दिलीय, त्यामुळे चाहत्यांची नक्कीच निराशा झालीय. 

फरहान एका मुलाखतीत मोठा खुलासा केला करत म्हणाला, "मी दिल चाहता है सिनेमाचा कोणताही सिक्वल बनवणार नाही. जेव्हा जेव्हा मला हा प्रश्न विचारण्यात येतो तेव्हा मला अजिबात कंटाळा आला नाही. लोकांनी या सिनेमाला खुप प्रेम दिलंय. परंतु दिल चाहता है 2 बनवण्याचा माझा कोणताही विचार नाही. दिल चाहता है मध्ये काहीतरी भर घालून मला सिक्वल करण्यात अजिबात रस नाही."

फरहान अख्तरने 'दिल चाहता है' सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. या सिनेमात आमिर खान, अक्षय खन्ना, सैफ अली खान, सोनाली कुलकर्णी, प्रीती झिंटा, डिंपल कपाडिया या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारल्या. हा सिनेमा चांगलाच गाजला. आजही गोव्याला जायचा प्लॅन झाला तर 'दिल चाहता है' सिनेमाची हटकून आठवण येते. 'दिल चाहता है'चा सिक्वल बनणार नाही, हे ऐकून अनेकांना दुःख झालं असेल, यात शंका नाही.

टॅग्स :फरहान अख्तरआमिर खानसैफ अली खान अक्षय खन्नाडिम्पल कपाडियासोनाली कुलकर्णी