Join us
Daily Top 2Weekly Top 5

झी मराठी वाहिनीवरील ही लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2021 15:40 IST

येत्या ७ मार्चला या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार आहे.

छोट्या पडद्यावरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. येत्या ७ मार्चला या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार आहे. माझ्या नवऱ्याची बायको मालिकेचा पहिला भाग २२ ऑगस्ट २०१६ रोजी प्रसारित झाला होता. तेव्हापासून गेल्या पाच वर्षांत या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केले आहे. विशेष म्हणजे मालिकेतील सगळ्याच कलाकारांच्या भूमिकांनी रसिकांची मनं जिंकली. गुरुनाथ, शनाया, राधिका यांच्यातील जुगलबंदी रसिकांना कायमच भावली.या मालिकेतील प्रत्येक व्यक्तीरेखा रसिकांच्या मनात घर करण्यात यशस्वी ठरली आहे.

‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिका सुरुवातीच्या काळापासून टीआरपीच्या रेसमध्येही अव्वल स्थानावर होती. मात्र, गेल्या काही दिवसांत ही मालिका मूळ ट्रॅकपासून बरीच भरकटली होती. त्यामुळे प्रेक्षक नाराज झाले होते. त्यामुळेच आता निर्मात्यांनी ही मालिका गुंडाळण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.

‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका बंद होणार असली तरी त्या जागी दुसरी नवी मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ‘घेतला वसा टाकू नका’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये पौराणिक कथा वेगळ्या पद्धतीने प्रेक्षकांना पाहता येणार आहेत. भगरे गुरूजी ही कथा मांडणार आहेत.अण्णा नाईक आणि शेवंत यांच्यातील केमेस्ट्रीमुळे लोकप्रिय ठरलेल्या ‘रात्रीस खेळ चाले’चा तिसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. गेल्या काही दिवसांपासून या मालिकेचा प्रोमो ‘झी मराठी’वर दाखवला जात आहे. हा प्रोमो चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. या मालिकेचे यापूर्वीचे दोन्ही भाग रंजक कथानकामुळे प्रचंड लोकप्रिय ठरले होते. त्यामुळे तिसऱ्या भागात काय पाहायला मिळणार, याची प्रचंड उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.

टॅग्स :माझ्या नवऱ्याची बायकोझी मराठी