Join us
Daily Top 2Weekly Top 5

चर्चा तर होणारच ! "तिने माझ्या पोटावर लाथ मारली", फराह खानने शिल्पाला खूप खरी खोटी सुनावली, video Viral

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2021 17:07 IST

फराह खान आण शिल्पा शेट्टी या दोघींचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. व्हिडीमध्ये दोघेही भांडताना दिसत आहेत. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहे.

सेलिब्रेटी कधी काय करतील काय नाही याचा अजिबात नेम नाही. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक गोष्टींची चर्चा ही होतच असते.सोशल मीडियावर फारह आणि शिल्पा दोघेही खूप सक्रिय असतात. त्यांचे लाखोंच्या संख्येत फॅन आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांची प्रत्येक गोष्ट चाहत्यांसाठी खास असते. लाईक्स आणि कमेंटस देत  चाहते त्यांचे प्रत्येक फोटो असो किंवा व्हिडीओ भरभरुन पसंती देत असतात.

फराह खान आण शिल्पा शेट्टी या दोघींचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. व्हिडीमध्ये दोघेही भांडताना दिसत आहेत. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहे. एका जाहीराती शूट दरम्यानचा हा व्हिडीओ आहे. मेजशीर असा हा व्हिडीओ असून शूटमधून वेळ मिळताच दोघींनाही बहुतेक काय करावे सुचले नसावे म्हणूनच हा व्हिडीओ त्यांनी शूट केला असावा. तुर्तास हा व्हिडीओवर चाहत्यांच्याही तुफान प्रतिक्रीया उमटत आहे. दरम्यान शिल्पाचा अंदाज नेहमीप्रमाणे घायाळ करणारा आहे. लाल रंगाच्या साडीत शिल्पाची अदा पाहून चाहतेही फिदा होत आहे. 

VIDEO : 'मैं आई हूं यूपी बिहार लूटने..!' लाल साडीतील शिल्पा शेट्टीचे लटके झटके पाहून फॅन्स झाले क्लीन बोल्ड

नुकतेच शिल्पा शेट्टीने मुंबईत लाल साडीत ग्लॅमरस अदा दाखवल्या ज्या पाहून लोक घायाळ झाले आहेत. ज्या प्रकारे अभिनेत्रीने मैं आई हूं यूपी बिहार लुटने या गाण्यात ठुमके लगावून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले होते तसाच अंदाज तिचा नुकताच पहायला मिळाला.

मुंबईत शूटिंग दरम्यान शिल्पाने नुकताच सेक्सी अवतार घेतला होता. त्यावेळी तिने लाल रंगाची साडी परिधान केली होती. तिने साडीवर बेल्ट लावला होता, जो साडीला चारचाँद लावत होता. डोक्याला टिक्का आणि गळ्यात मॅचिंग हार यामुळे त्याच्या सौंदर्याला चारचाँद लागले होते. शिल्पाने जेव्हा पॅपराझीला पाहून आपला पदर हलवून पोझ दिले. त्यावेळी तिच्या अदा पाहून सगळे थक्क झाले होते. तिचे या गेटअपमधील फोटो पाहून तिचे चाहते क्लीन बोल्ड झाले आहेत.

टॅग्स :शिल्पा शेट्टीफराह खान