Join us
Daily Top 2Weekly Top 5

Video: भाभी...भाभी... म्हणून ओरडू लागलेत फॅन्स; अशी झाली सारा अली खानची अवस्था

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2020 10:49 IST

होय, सारा व कार्तिक दोघेही स्टेजवर येताच लोकांनी ‘भाभी.... भाभी...’ ओरडणे सुरू केले.

ठळक मुद्देकाही दिवसांपूर्वी सारा व कार्तिकने आपल्या नात्यात ब्रेक घेतल्याची बातमी आली होती.

सैफ अली खान व अमृता सिंगची लाडकी लेक सारा अली खानचा दमदार डेब्यू झाला. पाठोपाठ अनेक सिनेमेही मिळालेत. सारा आता सैफ-अमृताची मुलगी म्हणून नाही तर बॉलिवूडची स्टार म्हणून ओळखली जाते. पण गेल्या काही दिवसांपासून सारा तिच्या चित्रपटांपेक्षा पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. होय, मध्यंतरी कार्तिक आर्यनसोबतच्या तिच्या अफेअरच्या चर्चा गाजल्या. दोघेही अनेकदा एकत्र स्पॉट झाले. यानंतर काय झाले कुणास ठाऊक पण अचानक दोघांच्या ब्रेकअपची बातमी आली. अर्थात या ब्रेकअपवर चाहत्यांचा मात्र जराही विश्वास नाही. ताजा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हालाही हे पटेल.

होय, सध्या कार्तिक व सारा त्यांच्या ‘लव्ह आज कल’ या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहेत. अशाच एका प्रमोशन इव्हेंटसाठी सारा व कार्तिक आग-याला पोहोचले. पण यादरम्यान जे काही झाले ते पाहून सारा व कार्तिक दोघेही थक्क झालेत. होय, सारा व कार्तिक दोघेही स्टेजवर येताच लोकांनी ‘भाभी.... भाभी...’ ओरडणे सुरू केले. कार्तिक हे पाहून हसू लागला. पण सारा मात्र काहीसी अवघडल्यासारखी दिसली. भाभी.... भाभी... ऐकून ती शॉक्ड झाली. सारा व कार्तिकचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

काही दिवसांपूर्वी सारा व कार्तिकने आपल्या नात्यात ब्रेक घेतल्याची बातमी आली होती. पण सारा व कार्तिकचे फॅन्स मात्र हे ब्रेकअप मानायला तयार नाहीत, हेच या व्हिडीओवरून दिसतेय. एकंदर काय तर ही रिल लाईफ जोडी रिअल लाईफ जोडी म्हणून पाहण्याची चाहत्यांची इच्छा आहे.  ही इच्छा पूर्ण होईल की नाही, याचे उत्तर तर येणारा काळच देईल.

टॅग्स :सारा अली खानकार्तिक आर्यनलव आजकल