Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रसिद्ध मराठी अभिनेत्री नुकतीच अडकली लग्नबेडीत, See Photos

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2019 16:22 IST

बॉलिवूडप्रमाणेच मराठी सिनेइंडस्ट्रीत सध्या लग्नाचे वारे वाहत आहेत.

बॉलिवूडप्रमाणेच मराठी सिनेइंडस्ट्रीत सध्या लग्नाचे वारे वाहत आहेत. अभिनेत्री स्मिता तांबे, मराठी रॅपर जेडी किंग उर्फ श्रेयश जाधव नंतर आता अभिनेत्री नेहा गद्रे नुकतीच लग्नबेडीत अडकली आहे. सोशल मीडियावर तिच्या लग्नाचे फोटो सध्या पाहायला मिळत आहेत. 

'मन उधाण वाऱ्याचे' फेम अभिनेत्री नेहा गद्रे नुकतीच ईशान बापटसोबत लग्नबेडीत अडकली आहे. १० जुलै २०१८मध्ये नेहाने कुटुंबातील सदस्य आणि काही मोजक्या नातेवाईकांच्या समवेत या दोघांनी साखरपुडा उरकून घेतला होता.

 

आता काही दिवसांपूर्वीच तिचा विवाह पुण्यातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये पार पडला आहे. यावेळी मराठी सिनेइंडस्ट्रीतील काही कलाकार मंडळींनी हजेरी लावली होती. 

नेहा पेशाने डॉक्टर असून एमबीबीएस ची पदवी प्राप्त केली. पण नेहाला अभिनयात रुची वाटू लागली. सह्याद्री वाहिनीवरील अंतक्षरी आणि झी सारेगम शोमध्ये ती झळकली होती.

गौरव महाराष्ट्राचा या शोमध्ये तिने परिक्षकाची भूमिका निभावली. परंतु “मन उधाण वाऱ्याचे” या मालिकेमुळेच नेहाला प्रसिद्धी मिळाली होती.

यानंतर तिने “अजूनही चांद रात आहे ” या मालिकेत रेवाची भूमिका साकारली. “मोकळा श्वास” चित्रपटात मृण्मयी देशपांडेच्या बहिणीच्या भूमिकेत ती दिसली. बऱ्याच कालावधीनंतर नेहाने अभिनित केलेला “गडबड झाली” चित्रपट साकारलेला पाहायला मिळाली. तर ईशान बापट क्राइमस्टॉपर्स क्वीनलँड येथे कार्यरत आहे. 

टॅग्स :दीप्ती देवी