Join us
Daily Top 2Weekly Top 5

घेतला वसा टाकू नको मालिकेत प्रसिद्ध अभिनेत्रीची एंट्री, पाहून चाहतेही होती खुश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2021 12:39 IST

चातुर्मासातल्या कथा आणि व्रतवैकल्य प्रेक्षकांना मालिकारूपात 'घेतला वसा टाकू नको' या कार्यक्रातून पाहायला मिळतात आणि हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या आवडीचा आहे.

'मिसेस मुख्यमंत्री' छोट्या पडद्यावर चांगलीच गाजली होती. मालिकेचे कथानक आणि दमदार कलाकारांची फौज यामुळे रसिकांची आवडती मालिका बनली होती. मालिकेच्या पहिल्या भागापासून रसिक मालिकेला खिळून होते. याच मालिकेतून अमृता धोंगडेला बरीच लोकप्रियता मिळाली. या मालिकेमुळे तिला वेगळी ओळख मिळाली. तिचा प्रचंड मोठा चाहता वर्ग निर्माण झाला. सुमीची भूमिका तिने साकारली होती. 

दिवसेंदिवस चाहत्यांच्या संख्येतही वाढ होत आहे. सोशल मीडियावरही ती प्रचंड सक्रीय असते. तिचे फोटो व्हिडीओ ती चाहत्यांसह शेअर करत असते. तिचा प्रत्येक अंदाज पाहून चाहते तिच्या फोटोला भरभरुन लाईक्स आणि कमेंट्स देत असल्याचे पाहायला मिळते. मालिका संपून बरेच दिवस झाले असले तरी,अमृता धोंगडे मात्र रसिकांच्या चांगलीच आठवणीत आहेत. त्यामुळे अमृताचे चाहते तिला प्रचंड मिस करत होते. अखेर चाहत्यांना तिला पुन्हा ऑनस्क्रीन पाहण्याची ईच्छाही पूर्ण होणार आहे. रसिकांची आवडती अमृता लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे. 

आपण सर्वांनीच आपल्या लहानपणी आजीकडून किंवा आईकडून 'एक आटपाट नगर होतं तिकडे एक साधुवाणी राहत होता' या चातुर्मासाच्या गोष्टी ऐकल्या असतील, याच चातुर्मासातल्या कथा आणि व्रतवैकल्य प्रेक्षकांना मालिकारूपात 'घेतला वसा टाकू नको' या कार्यक्रातून पाहायला मिळतात आणि हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या आवडीचा आहे. नुकतंच प्रेक्षकांनी नवरात्री विशेष भाग अनुभवले. या सगळ्या भागांना चांगलाच प्रतिसाद मिळाला.

आता येत्या आठवड्यापासून शनीदेवांची जन्मकथा आणि शनी देव माहात्म्य प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. या निमित्ताने मिसेस मुख्यमंत्री या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अमृता धोंगडे एका पौराणिक भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेत ती सूर्यदेवांच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. ही भूमिका साकारताना आणि पुन्हा एकदा टेलिव्हिजन या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी अमृताने उत्सुकता व्यक्त केली आहे.

टॅग्स :अमृता धोंगडेमिसेस मुख्यमंत्री