Join us
Daily Top 2Weekly Top 5

मराठी सिनेइंडस्ट्रीतील या प्रसिद्ध अभिनेत्रीच्या लेकीनेही केले अभिनय क्षेत्रात पदार्पण, दिसते पण लय भारी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2021 07:00 IST

या अभिनेत्रीने मराठी आणि हिंदी मालिकेशिवाय मराठी चित्रपटात काम केले आहे.

नुकतीच दिवाळी स्पेशल ‘शॉपर्स टॉप’ची जाहिरात प्रदर्शित झाली आहे. या जाहिरातीत झळकणारी ही मुलगी मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रीची लेक आहे. या व्यावसायिक जाहिरातीतून अभिनेत्रीच्या मुलीने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे. जाहिरातीत झळकणाऱ्या या मुलीचे नाव आहे सई गोडबोले.

सई गोडबोले ही मराठी चित्रपट अभिनेत्री किशोरी गोडबोले यांची कन्या आहे. किशोरी गोडबोलेने अनेक मराठी चित्रपट तसेच मराठी आणि हिंदी मालिकेत काम केले आहे. मराठीतील प्रसिद्ध गायक जयवंत कुलकर्णी यांची ती कन्या आहेत.

मिसेस तेंडुलकर, माधुरी मिडल क्लास, अधुरी एक कहाणी, हद कर दी, एक दो तीन, खिडकी, मेरे साई यासारख्या हिंदी आणि मराठी मालिकेत किशोरी गोडबोलेने काम केले आहे. मालिकांव्यतिरिक्त किशोरीने काही नावाजलेले मराठी चित्रपट जसे फुल ३ धमाल, खबरदार, कोहराम, वन रूम किचनमध्ये काम केले आहे.

सईचे वडील सचिन गोडबोले हे प्रसिद्ध व्यावसायिक आहेत. दादर येथे त्यांचे गोडबोले स्टोअर्स असून त्यातून त्यांच्या दिवाळी फराळाला अगदी परदेशात देखील मोठ्या प्रमाणात मागणी असते. सचिन आणि किशोरी गोडबोले यांना सई आणि गौरी या दोन मुली आहेत. किशोरी गोडबोले सध्या मराठीत फार कमी काम करताना दिसत आहे. मात्र हिंदी मालिकेत तिने आपला चांगलाच जम बसवलेला पाहायला मिळतो आहे. मेरे साई या हिंदी मालिकेत किशोरीने बायजा माँची भूमिका केली आहे. किशोरी गोडबोलेची लेक सई गोडबोले आईप्रमाणे अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. सईला वेगवेगळ्या रेसिपीज बनवण्याची आवड आहे. शिवाय वडिलांना गोडबोले स्टोअर्स सांभाळण्यास देखील मदत करताना दिसते. 

टॅग्स :किशोरी गोडबोले