Join us  

श्वेता तिवारी तिच्यापेक्षा 10 वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्याच्या प्रेमात ? फहमान खान म्हणाला - 'आम्ही दोघं रिलेशनशिपमध्ये...'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2024 4:43 PM

श्वेता तिवारी पुन्हा एकदा प्रेमात पडल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

श्वेता तिवारीला टीव्ही मालिका 'कसौटी जिंदगी की' मधून घराघरांत ओळख मिळाली. हिंदी मालिका, बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवणारी श्वेता सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते.  सोशल मीडियावर तिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. श्वेता तिवारी तिच्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.  श्वेता तिवारी पुन्हा एकदा प्रेमात पडल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. या चर्चांवर अभिनेत्यानं अखेर मौन सोडलं आहे.

 श्वेताने दोनदा लग्न केली आहेत. पण, तिची दोन्ही लग्ने अपयशी ठऱली. आता श्वेता तिवारीचे नाव तिच्यापेक्षा १० वर्षांनी लहान असलेल्या फहमान खानसोबत जोडलं जात आहे. श्वेता तिवारीचा पती अभिनव कोहलीने असाच दावा केला होता. यावर आता फहमान खानने प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला, 'माझी प्रतिमा कॅसानोवासारखी आहे, त्यामुळे त्याचं नाव कोणाशीही जोडलं जातं'.

पुढे तो म्हणाला, ‘हे साफ खोटं आहे. आमच्यात असं काहीच नव्हतं. आम्ही रिलेशनशिपमध्ये असल्याचं लोक म्हणून लागले, तेव्हा आम्ही दोघे एकत्र बसून या बातम्यांवर खूप हसायचो. मी श्वेताला माझी गुरु मानतो, त्यामुळे आमच्यात असं काही असण्याचा प्रश्नच नाही'. दरम्यान श्वेता तिवारीचं व्यावसायिक आयुष्य यशस्वी झालं असलं तरी तिचं वैयक्तिक आयुष्य मात्र संघर्षमय राहिलं. 

श्वेता तिवारीने 1998 मध्ये अभिनेता राजा चौधरीसोबत लग्न केलं होतं. परंतु त्यांचं लग्न फार काळ टिकू शकलं नाही. 2007 मध्ये या दोघांनी घटस्फोट घेतला होता . या दोघांना पलक ही मुलगी आहे. यानंतर श्वेतानं अनुभव कोहली याच्यासोबत लग्न केले. पण, हा संसार देखील टिकू शकला नाही. अनुभव कोहली आणि श्वेता तिवारी यांचा देखील घटस्फोट झाला. आता श्वेता तिवारी ही मुंबईमध्ये आपल्या मुलांसोबत राहते. श्वेता ही रेयांश आणि पलक या दोन मुलांची आई आहे. तर श्वेता लवकरच रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन'मध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. 

टॅग्स :श्वेता तिवारीसेलिब्रिटीबॉलिवूडसोशल मीडियालग्न