Join us
Daily Top 2Weekly Top 5

घाडगे अँड सून मालिकेतून 'या' अभिनेत्रीची होणार एक्झिट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2018 06:30 IST

घाडगे अँड सून या मालिकेमधील कियारा म्हणजेच रिचा अग्निहोत्री आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.अक्षय आणि कियारा यांच्या लग्नानंतर रिचा हि मालिका सोडणार आहे.

घाडगे अँड सून या मालिकेमधील कियारा म्हणजेच रिचा अग्निहोत्री आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.अक्षय आणि कियारा यांच्या लग्नानंतर रिचा हि मालिका सोडणार आहे. कलर्स मराठीच्या ढोलकीच्या तालावर या डान्स शो मधून आपण तिचे बहारदार परफॉर्मन्स पाहिले आहेत. 

रिचाला नवीन प्रोजेक्ट मिळाला असल्यामुळे ती हि मालिका सोडत आहे असे समजले. शूटिंगच्या शेवटच्या दिवशी रिचाला सर्वानी प्रेमाने निरोप दिला आणि शुभेच्छा दिल्या. आता नवीन कियारा कोण असेल याची उत्सुकता वाढली आहे.

घाडगे & सून या मालिकेत भाग्यश्री लिमये आणि चिन्मय उद्गिरकरची मुख्य भूमिकेत दिसतायेत. ही जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे.  भाग्यश्री लिमयेची ही पहिलीच मालिका आहे. भाग्यश्री ही मुळची सोलापूरची असून तिचे शिक्षण पुण्यामध्ये झाले आहे. कॉलेजमध्ये असताना भाग्यश्री आणि तिच्या एका मैत्रिणीचे चिन्मय उद्गिरकर क्रश होते, त्यांना तो खूपच आवडायचा.

रिचा आपल्याला गौरी नलावडेसोबत वेबसीरिजमध्ये दिसली होती. या दोघी बॅग पॅक महाराष्ट्रातल्या गूढ, अगम्य जागा प्रेक्षकांना दाखवल्या होत्या. या शो ची संकल्पना आणि दिग्दर्शन संतोष कोल्हे यांनी केले आहे. द फिल्म क्लिक आणि कनेक्ट फिल्म्स या संस्थांनी या वेब चॅनलची निर्मिती केली आहे. अनेकजण महाराष्ट्रातल्या नवनवीन ठिकाणांना नेहमीच भेटी देत असतात. पण आडवाटेवरचा महाराष्ट्र या वेबसिरिजमध्ये दाखवण्यात आले आहे. भटकंती मालिका करत असतानाच हा गूढ अगम्य आणि नैसर्गिक आश्चर्याने नटलेला महाराष्ट्र फिरायचा अशी कल्पना होती, असे दिग्दर्शक संतोष कोल्हे यांनी सांगितले होते. 

टॅग्स :घाडगे अँड सून