Join us

Exclusive : सावनी रविंद्रचा हॉट लूक पाहून चाहते झाले घायाळ, नव्या वर्षात सावनीचा नवा धमाका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2018 17:03 IST

मराठीतली गोड गळ्याची गायिका आणि सध्या तरूणाईत आपल्या वैविध्यपूर्ण गाण्यांनी सुप्रसिध्द असलेल्या सावनी रविंद्रने 2019मध्ये आपल्या लूकसोबत एक्सिपिरीमेंट करताना दिसणार आहे.

ठळक मुद्देसावनी रविंद्रचा बोल्ड आणि घायाळ करणार अंदाज

मराठीतली गोड गळ्याची गायिका आणि सध्या तरूणाईत आपल्या वैविध्यपूर्ण गाण्यांनी सुप्रसिध्द असलेल्या सावनी रविंद्रने 2019मध्ये आपल्या एक्सिपिरीमेंट करताना दिसणार आहे. सावनीचे नवे फोटोशूट तिने सोशल मीडियावर शेअर केले आहे. त्यात नेहमी साडीत आणि इंडियन आऊटफिटमध्ये दिसणारी सावनी वेस्टर्न आणि कॅज्युअल वेअरमध्ये दिसून येतेय.

सावनी आपल्या ह्या फोटोशूटविषयी म्हणते, “खरं तर, माझ्या जवळच्या लोकांनी मला वेस्टर्न आटफिट्स आणि कॅज्युअल वेअरमध्ये नेहमीच पाहिलं आहे. पण सांगितिक कार्यक्रमांना मात्र मी नेहमीच भारतीय आउटफिटच घालण्यावर भर देत असल्याने माझ्या ब-याच चाहत्यांसाठी माझा हा अपिअरन्स नवा आहे. सध्या ह्या फोटोशूटविषयी चाहत्यांकडून खूप चांगल्या प्रतिक्रिया येत आहेत. ह्याचा मला आनंद आहे.” 

 

बॉलिवूडच्या सगळयाच आघाडीच्या गायिकांना कॉन्सर्ट्स, रिएलिटी शो आणि सोशल मीडियाव्दारे त्यांचे चाहते अशा कॅज्युअल लुक्समध्ये पाहत असतात. मात्र मराठीतल्या गायिकांना आपल्या लुक्सबाबत खूप एक्सपिरीमेन्ट करताना कमीच पाहिलं जातं. ह्याविषयी सावनी म्हणते, “मला माझे बरेच चाहते सोशल मीडियावरून माझ्या स्टाइल स्टेटमेंटविषयी विचारत असतात. म्हणून मी स्वत: ज्या कपड्यांमध्ये कम्फर्टेबल आहे. त्याच कपड्यांमध्ये हे नवे फोटोशूट केले. कारण आपण ज्यात जास्त कम्फर्टेबल आहोत, तीच फॅशन आणि स्टाइल आपण उत्तम कॅरी करू शकतो, असे मी मानते.”

 

टॅग्स :सावनी रविंद्र