Join us

अरबाज खानच्या दुसऱ्या लग्नावर एक्स गर्लफ्रेंडनं सोडलं मौन, म्हणाली - "जेव्हा नाते संपते..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2024 14:57 IST

Giorgia Andriani:अरबाज खान आणि जॉर्जिया अँड्रियानी बराच काळ एकमेकांना डेट करत होते. मात्र अरबाजने शूरा खानसोबत लग्न केले आहे.

अभिनेता अरबाज खान(Arbaaz Khan)ने मेकअप आर्टिस्ट शूरा खान(Shura Khan)सोबत लग्न केले आहे. यापूर्वी अरबाज खान आणि जॉर्जिया अँड्रियानी(Giorgia Andriani)ने बराच काळ एकमेकांना डेट केले होते. मात्र लग्नाआधी त्या दोघांचं ब्रेकअप झाले. त्यानंतर अरबाजने शूरासोबत दुसऱ्यांदा संसार थाटला. दरम्यान आता अरबाज खानच्या लग्नानंतर त्याची एक्स गर्लफ्रेंड जॉर्जियाने मौन सोडले आहे. ती म्हणाली की, अभिनेत्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर जीवनात एकटेपणा आला आहे. इतकेच नाही तर तिने अरबाजचं कौतुकदेखील केले आहे.

एका मुलाखतीत जॉर्जिया अँड्रियानी म्हणाली की, अरबाज एक चांगला व्यक्ती आहे. हो, आम्ही वेगळे झालो आहोत आणि एक पार्टनर गमावल्यामुळे एकटेपणा कायम राहील. विसरणं सोपे नाही कारण व्यक्तीगतरित्या तुम्ही कोणत्यातरी नात्यात अडकता. मात्र नाते संपले की, तुम्हाला पुढे जावेच लागते. मी माझ्या आयुष्याच्या दुसऱ्या अध्यायाकडे वाटचाल करत असताना मी त्याला शुभेच्छा देते. 

आमच्यात काहीच साम्य नव्हते...

जॉर्जिया पुढे म्हणाली, 'मी एक विक्षिप्त व्यक्ती आहे आणि मला माझ्या इच्छेनुसार प्रवास करायला आवडतो आणि मी त्याचा खूप आनंद घेत आहे. माझ्यासाठी आनंद म्हणजे कोणत्याही पश्चाताप न करता माझ्या इच्छा पूर्ण करणे आहे. कठोर परिश्रम करा आणि भरपूर आनंद घ्या. नातेसंबंधात मी समान हितसंबंधांला महत्त्व देते परंतु दुर्दैवाने, आमच्यात काहीच साम्य नव्हते.   

टॅग्स :अरबाज खानजॉर्जिया एंड्रियानी