Join us

पॉर्न स्टार झोई पारकरचं निधन, वयाच्या २४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2020 15:34 IST

अचानक झालेल्या निधनामुळे तिच्या जवळच्या लोकांना चांगलाच धक्का बसला. zoe च्या जोडीदाराने GoFundMe नावाचं पेज तयार करून याची माहिती दिली की, zoe आता आपल्यात नाही.

अमेरिकन अॅडल्ट इंडस्ट्रीतील माजी पॉर्न स्टार झोई पारकरचं निधन झालंय. शेवटचा श्वास घेतला तेव्हा झोई केवळ २४ वर्षाची होती. याची माहिती zoe चा होणारा पती कॅम्पबेलने दिली. zoe चं निधन शनिवारी १२ सप्टेंबरला अचानक रात्री २ वाजता झालं. तिच्या अचानक झालेल्या निधनामुळे तिच्या जवळच्या लोकांना चांगलाच धक्का बसला. zoe च्या जोडीदाराने GoFundMe नावाचं पेज तयार करून याची माहिती दिली की, zoe आता आपल्यात नाही.

zoe च्या पार्टनरने हे पेज तयार करून तिच्याबाबत माहिती दिली तर दिलीच सोबतच पेजच्या माध्यमातून माजी पॉर्न स्टारच्या अंत्यसंस्कारासाठी पैसेही जमा केले. zoe ने एक महिन्याआधीच पॉर्न इंडस्ट्रीला सोडचिठ्ठी दिली होती. कारण zoe ला एक नव्या आयुष्याला सुरूवात करायची होती. तिला परिवारासोबत जास्त वेळ घालवायचा होता. त्यासाठी ती टेक्सासला आली होती आणि तिने कॅम्पाबेलसोबत साखरपुडाही केला होता.

zoe सोशल मीडियावर चांगलीच अ‍ॅक्टिव राहत होती. ती नेहमीच तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत होती. zoe पॉर्न इंडस्ट्री सोडून केवळ एक महिनाच झाला होता. त्यामुळे तिच्या निधनामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. आतापर्यंत हे समजू शकलं नाही की, zoe चा मृत्यू कशामुळे झाला. तिच्या पार्टनरचं मत आहे की, zoe रात्री झोपली आणि उठलीच नाही. त्यामुळे तिच्या मृत्यूवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.

झोई पारकरने जवळपास १०० पॉर्न सिनेमात काम केलं होतं. झोई अमेरिकेच्या टेक्सासची राहणारी आहे. तिने २०१४ मध्ये पॉर्न इंडस्ट्री जॉइन केलं होतं. यासाठी ते लॉज एंजलिसला गेली आणि तिने पॉर्न इंडस्ट्रीला फुल टाइम करिअर म्हणून निवडलं होतं. 

टॅग्स :हॉलिवूडआंतरराष्ट्रीय