Join us
Daily Top 2Weekly Top 5

OMG!! सुश्मिता सेनचे रोहमन शॉलसोबतही ब्रेकअप?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2019 10:17 IST

अलीकडे सुश्मिताच्या भावाच्या लग्नातही रोहमन भाव खाऊन गेला होता. सुश्मितासोबत मिरवण्यापासून तर तिच्यासोबत रोमॅन्टिक डान्स करण्यापर्यंत या लग्नात तो सक्रीय होता. पण आता सुश्मिता व रोहमन या दोघांचे ब्रेकअप झाल्याची चर्चा कानावर येतेय.

ठळक मुद्देसुश्मिताच्या आयुष्यात एन्ट्री घेणारा रोहमन पहिला नाही, हे तुम्हाला ठाऊक आहेच. याआधी सुश्मिताचे नाव अनेकांशी जुळले आहे.

माजी मिस युनिव्हर्स आणि बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेन हिच्या आयुष्यात कधीच रोहमन शॉल याची एन्ट्री झाली होती. स्वत:पेक्षा 15 वर्षांनी लहान असलेल्या रोहमनसोबतचे सुश्मिताचे फोटो चर्चेचा विषय ठरले होते. अगदी अलीकडे सुश्मिताच्या भावाच्या लग्नातही रोहमन भाव खाऊन गेला होता. सुश्मितासोबत मिरवण्यापासून तर तिच्यासोबत रोमॅन्टिक डान्स करण्यापर्यंत या लग्नात तो सक्रीय होता. पण आता सुश्मिता व रोहमन या दोघांचे ब्रेकअप झाल्याची चर्चा कानावर येतेय. होय, सुश्मिताचा बॉयफ्रेन्ड रोहमन शॉल याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरून या दोघांमध्ये काहीतरी बिनसल्याचे दिसतेय. सुश्मितानेही रोहमनला सोशल मीडियावर फॉलो करणे बंद केले आहे.    इन्स्टाग्राम स्टोरीवर रोहमनने एका मागोमाग एक चार पोस्ट केल्या आहेत.

‘हे यू, मी तुझ्याशी बोलतोय.  तुला नेमका कशाचा त्रास होतोय? प्लीज,मला सांग, मी सर्वकाही मन लावून ऐकतोय. 24 तास,’ असे पहिल्या पोस्टमध्ये त्याने लिहिले आहे.

 दुस-या एका पोस्टमध्ये रोहमने लिहिले आहे की,‘  हे नातं पुढे नेण्यासाठी तुम्ही खूप काही करत आहात आणि तुमचा जोडीदार काहीच करत नाही, असे तुम्हाला वाटते. ठीक आहे. पण तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी जे काही करत आहात तो तुमचा निर्णय आहे. तुमच्या जोडीदाराकडूनही तुम्ही तशाच वागणूकीची अपेक्षा करू शकत नाही. त्याच्यासाठी तुम्ही त्या गोष्टी करा ज्या खरंच तुम्हाला कराव्याशा वाटतात. त्यानेही आपल्याशी तसेच वागावे यासाठी काहीही करु नका.’

पुढच्या पोस्टमध्ये तो लिहितो, ‘तुम्हाला वाटते की, तुमच्या जोडीदाराने तुम्हालाही तशीच वागणूक द्यावी जशी तुम्ही त्याला देता, कारण तुम्ही त्या नात्यात आहात. पण   कुणी तुमच्यासोबत चांगले वागत नाही आणि तरीही तुम्ही त्याच्यासोबत आहात तर   ही तुमची चूक आहे. म्हणून स्वत:वर प्रेम करायला शिका.’

 आपल्या चौथ्या पोस्टमध्ये रोहमन भावूक झालेला दिसतोय. तो लिहितो,‘ तुम्ही कधी एकटे राहून कंटाळता? ठीक आहे. रोज टीव्ही, फोन, पुस्तकांच्याशिवाय 15-20 मिनिटे स्वत:सोबत घालवा. स्वत:चा आवाज ऐका. यामुळे तुम्हाला अनेक प्रश्नांची उत्तर मिळायला सुरुवात होईल.’रोहमनच्या या पोस्ट बरेच काही सांगणाºया आहेत. सुश्मितासोबत त्याचे काहीतरी बिनसले, हे या पोस्टवरून कळायला वेळ लागत नाही. आता सुश्मिता खरोखर रूसली असेल तर तिचा हा रूसवा रोहमन कसा दूर करतो, ते बघूच.

अनेकांशी जुळले नावसुश्मिताच्या आयुष्यात एन्ट्री घेणारा रोहमन पहिला नाही, हे तुम्हाला ठाऊक आहेच. याआधी सुश्मिताचे नाव अनेकांशी जुळले आहे. इंडस्ट्रीत अगदी नवखी असताना सुश्मिता व विक्रम भट्ट या दोघांच्या प्रेमाच्या चर्चा रंगल्या होत्या. सुश्मितासाठी विक्रमने आपल्या पत्नी व मुलीलाही सोडले होते. पण इतके करूनही सुश्मिता विक्रमच्या आयुष्यात टिकली नाही. पुढे विक्रमने या रिलेशनशिपबद्दल पश्चातापही व्यक्त केला होता. विक्रमनंतर सुश्मिताच्या आयुष्यात रणदीप हुड्डाची एन्ट्री झाली. सुश्मिताची दत्तक मुलगी रेनी हिलाही रणदीप आवडायचा. पण काही वर्षांत या रिलेशनशिपचाही शेवट झाला. केवळ रणदीपचं नाही तर, वसीम अकरम, बंटी सचदेवा, संजय नारंग, बिल्डर इम्तियाज खत्री यांच्यासोबतही सुश्मिताचे नाव जोडले गेले. यानंतर सुश्मिता आणि रितिक भसीन या दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगल्यात. यानंतर सुश्मिताच्या आयुष्यात रोहमनची एन्ट्री झाली होती.

टॅग्स :सुश्मिता सेन