आपल्या बोल्डनेस आणि बिनधास्तपणासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री ईशा गुप्ता सध्या एका वादात अडकली आहे. ईशाविरोधात एका व्यक्तीने मानहानीचा दावा ठोकला आहे. मानहानीचा दावा ठोकणारी ही व्यक्ती दिल्लीचा एक बिझनेसमॅन आहे. काही दिवसांपूर्वी ईशाने या बिझनेसमॅनवर गैरवर्तनाचा आरोप केला होता. सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून ईशाने आपबीती सांगितली होती. या पोस्टसोबत संबंधित बिझनेसमॅनचा फोटो आणि त्याचे नावही तिने जगजाहिर केले होते.
या अभिनेत्रीवर दिल्लीच्या उद्योगपतीने ठोकला मानहानीचा दावा, जाणून घ्या काय आहे प्रकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2019 11:28 IST
आपल्या बोल्डनेस आणि बिनधास्तपणासाठी ओळखली जाणारी ही अभिनेत्री सध्या एका वादात अडकली आहे.
या अभिनेत्रीवर दिल्लीच्या उद्योगपतीने ठोकला मानहानीचा दावा, जाणून घ्या काय आहे प्रकरण
ठळक मुद्देईशाला शिक्षा व्हावी आणि मला योग्य भरपाई मिळावी, असे या बिझनेसमॅनने म्हटले आहे.