Join us
Daily Top 2Weekly Top 5

ईशा गुप्ताने शेअर केला वर्कआऊटचा फोटो..फोटो बघून चाहते झाले क्लीन बोल्ड

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2020 11:53 IST

ईशाला बॉलिवूडची ‘अँजेलिना जॉली’ म्हटले जाते.

ईशाला बॉलिवूडची ‘अँजेलिना जॉली’ म्हटले जाते. 2007 मध्ये मिस इंडिया इंटरनॅशनल हा किताब आपल्या नावावर करणारी ईशा बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. इमरान हाश्मीसोबत ईशा गुप्ताने ‘जन्नत 2’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. सोशल मीडियावर ईशा खूपच अॅक्टिव्ह असते. आपले बोल्ड आणि हॉट फोटो ती शेअर करत असते. पुन्हा एकदा ईशा तिच्या फोटोमुळे चर्चेत आली आहे. या फोटोत ती वर्कआऊट करताना दिसतेय.  ईशाचा हा ब्लॅक अँड व्हाईट आहे. यात ती मोनोकिनी वर्कआऊट करताना दिसतेय. ईशाच्या फॅन्सना तिचा हा फोटो चांगलाच आवडला आहे. 

ईशाने काही दिवसांपूर्वी रिलेशनशीपमध्ये असल्याचे सांगितले होते, मॅन्युअलसोबतचे नाते तिने स्वत:च जगजाहिर केले. मॅन्युअल हा एक बिझनेसमॅन आहे. तो स्पेनमध्ये राहतो़ काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत ईशा बॉयफ्रेन्डबद्दल बोलली होती..

ईशा बॉलिवूडमध्ये बेबी, रुस्तम व बादशाहो, कमांडो, चक्रव्यूह सारख्या चित्रपटात झळकली आहे. शेवटची ईशा ‘टोटल धमाल’ चित्रपटात दिसली होती. बॉक्स आॅफिसवर या सिनेमा चांगला गल्ला जमावला होता

टॅग्स :ईशा गुप्ता