Join us
Daily Top 2Weekly Top 5

ईशा देओल सिनेमातून नाही तर या माध्यमातून करणार कमबॅक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2018 18:39 IST

ईशा देओल बंगाली वधूच्या गेटअपमध्ये दिसणार आहे.

ठळक मुद्दे'केकवॉक' ही बावीस मिनिटांचा लघुपट असून यात ईशा शेफच्या भूमिकेत दिसणार आहे. बंगाली वधूचा गेटअप करायला ईशाला लागले तीन तास

अभिनेते धर्मेंद्र व हेमा मालिनी यांची मुलगी ईशा देओल लवकरच कमबॅक करणार आहे. ती 'केकवॉक' या लघुपटात पुनरागमन करणार आहे. नुकतेच तिने इन्स्टाग्रामवर या लघुपटातील लूक शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती बंगाली वधूच्या गेटअपमध्ये दिसणार आहे. 

ईशा देओलने सोशल मीडियावर 'केकवॉक'मधील तिच्या लूक व लघुपटाचा पोस्टर शेअर केला आहे व लिहिले की, राम कमल मुखर्जी यांच्या केकवॉक लघुपटातील माझा बंगाली लूक कोलकातामध्ये लाँच केला. प्रसारमाध्यमांशी चर्चा करायला मजा आली.'केकवॉक' ही बावीस मिनिटांचा लघुपट असून यात ईशा शेफच्या भूमिकेत दिसणार आहे. तिने सांगितले की, '‘केकवॉक या चित्रपटाचा विषय आणि त्यातून दिला जाणारा संदेश दोन्ही प्रभावशाली आहे. मला या लघुपटात काम करायला खूप मजा आली. बंगाली वधूचा गेटअप करायला मला जवळपास तीन तास लागले. दिग्दर्शक राम कमल यांनी प्रत्येक गोष्टीत बारकाईने लक्ष दिले आहे. त्यामुळे त्यांची आभारी आहे.' ईशाची बेस्ट फ्रेंड आणि प्रसिद्ध शेफ आणि अभिनेत्री शिर्लाना वेजने ईशाला शेफची भूमिका साकारण्यासाठी बेसिक ट्रेनिंग दिली आहे. शिर्लाना वेज बऱ्याचशा बॉलिवूड चित्रपटांमध्ये बघावयास मिळाली आहे. अभिनेता हृतिक रोशनच्या ‘न तुम जानों न हम’ या चित्रपटात ईशा आणि शिर्लाना यांनी मैत्रिणीची भूमिका साकारली होती. 'केकवॉक'चे आभ्रा चक्रवर्तीने सहदिग्दर्शन केले असून दिनेश गुप्ता, शेलेंद्र कुमार व अरित्रा दासने निर्मिती केली आहे. हा लघुपट ऑक्टोबरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या लघुपटात ईशा देओलसोबत छोट्या पडद्यावरील अभिनेता तरूण मल्होत्रा व अभिनेत्री अनिंदता चॅटर्जी दिसणार आहेत. ईशा देओल २०१५ मध्ये प्रदर्शित झालेला 'किल देम यंग' चित्रपटात झळकली होती. आता 'केकवॉक' लघुपटातील तिची भूमिका प्रेक्षकांना भावेल का हे पहावे लागेल. 

टॅग्स :इशा देओल