Join us
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा एकदा आजी आजोबा झाले धर्मेंद्र-हेमा मालिनी, लग्नाच्या सात वर्षांनंतर ईशा देओलला दुसऱ्यांदा कन्यारत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2019 13:47 IST

हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांची मुलगी ईशा देओलने १० जूनला दुसऱ्या मुलीला जन्म दिला आहे.

हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांची मुलगी ईशा देओलने १० जूनला दुसऱ्या मुलीला जन्म दिला आहे. तिने तिच्या दुसऱ्या मुलीचे नाव मिराया तख्तानी ठेवले आहे. ईशाने इंस्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून ही खुशखबरी चाहत्यांना दिली आहे. 

ईशाने दुसऱ्यांदा आई बनली आहे. यापूर्वी तिला एक दोन वर्षाची मुलगी राध्या आहे. ईशाने दुसरी मुलगी झाल्याची बातमी सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. प्रेग्नेंसी पूर्वी ती बेबी बंपच्या फोटोंमुळे खूप चर्चेत होती. या वर्षी जानेवारीत ईशाने आपल्या दुसऱ्या प्रेग्नेंसीबद्दलचा खुलासा केला होता.

ईशाने तिची पहिली मुलगी राध्याचा सोफ्यावर बसलेला एक फोटो शेअर केला होता आणि लिहिले की, माझे प्रमोशन होत आहे. मी मोठी बहिण बनणार आहे. 

काही दिवसांपूर्वी ईशाने बेबी शॉवर पार पडले. या निमित्ताने एका जंगी पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत जवळचे लोक व मित्र मंडळी उपस्थित होते. या दरम्यान ईशाने पिंक रंगाचा वन पीस परिधान केला होता. तर ईशाचा नवरा भरत तख्तानी व्हाईट शर्ट व पिंक ट्राउजरमध्ये पहायला मिळाला. 

३७ वर्षीय ईशा पुन्हा एकदा आई बनली आहे. ईशाला नेहमीच अशा मुलासोबत लग्न करायचे होते जो तिचे वडील धर्मेंद्र यांच्यासारखा हॅण्डसम असेल. ईशाला भरतमध्ये ती गोष्ट दिसली.

ईशा व भरतने पहिल्यांदा २९ जून, २०१२ मध्ये जुहू येथील इस्कॉन मंदिरमध्ये झाले होते. लग्नाच्या पाच वर्षानंतर प्रेग्नेंसीमध्ये ईशाने पुन्हा २४ ऑगस्ट, २०१७ मध्ये ईशाने राध्याला जन्म दिला होता.

टॅग्स :इशा देओलहेमा मालिनीधमेंद्र