Join us

एरिका फर्नांडिस मराठीतल्या 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत शेअर करणार स्क्रीन, साकारणार ही भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2021 17:38 IST

कसौटी जिंदगी के २ मधून एरिका फर्नांडिस लोकप्रिय झाली.

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री एरिका फर्नांडिसने सोशल मीडियावर लेटेस्ट फोटो शेअर करत असते. कसौटी जिंदगी के २ मधून एरिका फर्नांडिस लोकप्रिय झाली. लवकर एरिका सोनीवरील 'कुछ रंग प्यार के ऐसे भी – नई कहानी' या मालिकेच्या माध्यमातून  प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात तिच्यासोबत अभिनेता शहीर शेख मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 

 कुछ रंग प्यार के ऐसे भी – नई कहानी मालिकेत देव आणि सोनाक्षीची भूमिका करणार आहेत, शहीर शेख आणि एरिका फर्नांडिस आणि देवच्या आईच्या भूमिकेत  ज्येष्ठ अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर दिसणार आहेत. एका आकंठ प्रेमात असलेल्या जोडप्याच्या जीवनात कालांतराने कसे बदल होत जातात याचे चित्र या  मालिकेत बघायला मिळेल.  दिग्दर्शक आणि पटकथालेखक नितेश तिवारी या प्रोमोची पटकथा लिहिली आहे. 

आपल्या भूमिकेबाबत बोलतना एरिका म्हणाली, सोनाक्षी ही व्यक्तिरेखा माझ्या खूप जवळची आहे.  मला वाटते, जसजशी ही व्यक्तिरेखा मालिकेत विकसित होत गेली, तशी तशी मीही मोठी झाले. पुन्हा एकदा या कलाकारांबरोबर आणि क्रू सदस्यांबरोबर या नवीन वाटचालीसाठी काम करताना मजा येत आहे. प्रेक्षकांकडून मिळालेले प्रेम पाहून मी भारावून गेले आहे आणि मी इतकेच सांगेन की, तुमची निराशा होणार नाही. यावेळी, देव आणि सोना हे जरी एकमेकांबरोबर असले तरी त्यांच्यात पूर्वीसारखेच नाते आजही आहे का? आम्ही लवकरच तुम्हाला याचे उत्तर देऊ. 

टॅग्स :एरिका फर्नांडिससुप्रिया पिळगांवकर