Join us

"...तर मी तुला सोडून जाईन", इमरान हाशमीला पत्नीने दिली धमकी, अभिनेत्याचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2024 14:09 IST

इमरानच्या या सवयीला कंटाळून त्याच्या बायकोने त्याच्याशी काडीमोड घेण्याची धमकी दिली

इमरान हाश्मी हा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता. सिरियल किसर अशी ओळख असलेल्या इमरानने तो अभिनय किती चांगला करु शकतो हे विविध सिनेमांमधून दाखवून दिलंय. इमरान अनेकदा मुलाखतींमध्ये त्याच्या कुटुंबातले खास किस्से शेअर करत असतो. अशाच एका मुलाखतीत इमरानने त्याची बायको त्याला वारंवार सोडून जाण्याची धमकी का देते? यावर भाष्य केलंय.

इमरान गेल्या दोन वर्षांपासून कडक डायट फॉलो करतो. तो जे खातो ते त्याच्या बायकोला आवडत नाही. त्यामुळे इमरान म्हणाला, "माझी बायको मला सोडून जाणार होती. ती वारंवार मला धमकी देते. पण ती अजून सोडून गेली नाही. मी जे खातो ते ती खात नाही. मी गेल्या २ वर्षांपासून एक विशिष्ट डाएट फॉलो करतोय. avocado, brussels sprouts, lettuce, rocket leaves अशा गोष्टींचं मी सालाड खातो. याशिवाय चिकन खिमा, बटाटे या गोष्टींचाही माझ्या जेवणात समावेश असतो."

गेल्या २ वर्षांपासून सकाळी आणि रात्रीच्या वेळी जेवायला इमरान सातत्याने हे डाएट फॉलो करतोय. त्यामुळे इमरानच्या या सवयीला कंटाळून त्याच्या बायकोने त्याला सोडून जाण्याची धमकी दिली. एक अभिनेता स्वतःला फिट ठेवण्यासाठी काय करु शकतो, याचं उदाहरण इमरानने आपल्यासमोर ठेवलंय. इमरानची 'शो टाईम' ही वेबसिरीज हॉटस्टारवर रिलीज झालीय.

टॅग्स :इमरान हाश्मीबॉलिवूड