Join us
Daily Top 2Weekly Top 5

शाहरुख खानची बर्थडे पार्टी इम्रान हाश्मीने अर्ध्यातच सोडली; वाचा का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2023 16:39 IST

बॉलिवूडचा सीरिअल किसर म्हणून इम्रान हाश्मी ओळखला जातो.

बॉलिवूडचा सीरिअल किसर म्हणून इम्रान हाश्मी ओळखला जातो. पण तेवढ्या पुरताच तो मर्यादीत नाही हे त्याने अनेकदा दाखवून दिले आहे. त्याच्या अभिनयाचे अनेक चाहते आहेत. त्यात मुलींची संख्या आजही सर्वाधिक आहे. सध्या 'टायगर ३' सिनेमामुळे तो चर्चेत आहे. शाहरुख खानच्या वाढदिवसाची पार्टी अर्ध्यातून सोडून निघून आल्याचे त्याने सांगितले. शिवाय, यामागच्या कारणाचाही त्याने खुलासा केला.

 इम्रान हाश्मी 2 नोव्हेंबर रोजी शाहरुख खानच्या वाढदिवसाच्या पार्टीत सहभागी झाला होता. मात्र, ही पार्टी त्याच्यासाठी मजेदार नसल्याचं त्याने सांगितलं. तो म्हणाला, 'मी 12 वाजल्यानंतर तिथे थांबलो नाही. खरं तर, मी मध्यरात्री 12 नंतर जागत नाही. कारण मी सकाळी 6:30 ते 7 च्या दरम्यान उठतो. कोविड महामारीनंतर मी खूप शिस्तबद्ध झालो आहे आणि ही जीवनशैली मला खूप आवडते'.

 इम्रान पुढे म्हणाला, ' मी कधीच पार्टी पर्सन नव्हतो. कदाचित यातून काही फायदा मिळत नाही, म्हणून मी असा आहे.  पार्ट्यांना न जाण्याची सर्वात मोठी अडचण म्हणजे मी मद्यपान करत नाही. शिवाय, फिल्म इंडस्ट्रीवर बोलणेही मी टाळतो'. तर फिल्म स्क्रीनिंगला जाणेही आवडत नसल्याचे त्याने सांगितले. 

 इम्रान हाश्मीने  'मर्डर', 'जेहर', 'आशिक बनाया आपने', 'अक्सर', 'वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई' आणि 'गँगस्टर' यांसारख्या चित्रपटांमध्ये आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे. तर 'टायगर ३’ चित्रपटात  इम्रान खलनायकाच्या भूमिकेत असून सलमानला टक्कर देताना दिसत आहे. तर अलीकडेच तो ‘सेल्फी’ चित्रपटात खिलाडी अक्षय कुमारबरोबर स्क्रीन शेअर करताना दिसला होता. 

 

टॅग्स :इमरान हाश्मीबॉलिवूडशाहरुख खानसेलिब्रिटी