Join us
Daily Top 2Weekly Top 5

'नागिन ३'मध्ये होणार एली गोनीची एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2018 07:15 IST

स्टार प्लसवरील लोकप्रिय मालिका 'ये हैं मोहब्बतें'मधील रोमीची भूमिका करणारा अभिनेता एली गोनी लवकरच एकता कपूरची लोकप्रिय मालिका नागिन ३मध्ये दिसणार आहे.

ठळक मुद्दे एली गोनीची भूमिका अद्याप गुलदस्त्यात

स्टार प्लस वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'ये हैं मोहब्बतें'मध्ये रोमीच्या भूमिकेतून घराघरात पोहचलेला अभिनेता एली गोनी लवकरच निर्माती एकता कपूरची लोकप्रिय मालिका 'नागिन ३'मध्ये दिसणार आहे. 'ये हैं मोहब्बतें' मालिका देखील एकता कपूरची असून ही मालिकादेखील लोकप्रिय आहे. नुकतेच अभिनेता एली गोनीने 'नागिन ३' मध्ये एन्ट्रीबाबत कन्फर्म केले असून तो या मालिकेत दिसणार आहे.

'नागिन ३' मालिका लाँच झाल्यापासून आतापर्यंत या मालिकेने प्रेक्षकांचे मन वेधून घेतले आहे आणि या मालिकेला प्रेक्षकांची चांगली दाद मिळते आहे. या लोकप्रिय मालिकेचा एक भाग बनल्यामुळे एली खूप खूश आहे. अद्याप त्याला या मालिकेतील त्याच्या भूमिकेबद्दल जास्त माहिती नाही व तो कधीपासून मालिकेत एन्ट्री करणार हे देखील माहित नाही. सध्या 'नागिन ३' मालिकेत बेला आपल्या आईचा खूनी विक्रांत (रजत टोकस)ला मारण्यासाठी माहिरसोबत योजना आखते. आगामी भागात युवी बनून सहगल हाऊसमध्ये दाखल झालेला विक्रांत (इच्छाधारी नाग) साखरपुडा करण्याचेदेखील नाटक करतो, असे दाखवण्यात आले आहे.'नागिन ३' मालिका सुपरनॅचरल असून यात सुरभी ज्योती, पर्ल वी पुरी, रजत टोकस, रक्षंदा खान व अनीता हसनंदानी हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. या मालिकेता सुरभी ज्योती बेला नामक नागिनीच्या भूमिकेत असून पर्ल तिचा नवरा माहिरच्या भूमिकेत दिसणार आहे. आता एली गोनीची मालिकेत एन्ट्री झाल्यावर बेलाच्या आयुष्यात काय ट्विस्ट येणार हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.

टॅग्स :ये है मोहब्बतेंस्टार प्लस