Join us
Daily Top 2Weekly Top 5

सुशांतच्या स्मरणार्थ एकता कपूरने केली मोठी घोषणा, वाचून तुम्हाला वाटेल तिचे कौतूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2020 13:31 IST

सुशांत सिंग राजपूतच्या निधनाला एक महिना उलटला असून अद्याप त्याच्या आत्महत्येचे कारण समोर आलेले नाही. त्याच्या निधनाच्या धक्क्यातून अद्याप त्याचे चाहते व कलाकार सावरलेले नाहीत. त्यात आता प्रसिद्ध निर्माती एकता कपूरने मोठी घोषणा केली आहे.

सुशांत सिंग राजपूतच्या निधनाला एक महिना उलटला असून अद्याप त्याच्या आत्महत्येचे कारण समोर आलेले नाही. त्याच्या निधनाच्या धक्क्यातून अद्याप त्याचे चाहते व कलाकार सावरलेले नाहीत. त्यात आता प्रसिद्ध निर्माती एकता कपूरने मोठी घोषणा केली आहे. एकताने सुशांतला श्रद्धांजली देत मेंटल हेल्थ अवरनेस फंड सुरू करण्याची घोषणा केली आहे. या फंडचे नाव सुशांतची पहिली मालिका पवित्र रिश्ता ठेवण्यात आले आहे. यासाठी एकता व तरूण कतियल एकत्र काम करणार आहे.या फंडचा उद्देश लोकांच्या मानसिक स्वस्थ्याबाबत जनजागृती करणे.

याबद्दल एकता कपूर म्हणाली की, मागील दहा वर्षांत खूप काही बदलले आहे. आज प्रत्येक गोष्टीचा खूप दबाव असतो. अशा महारोगराईत आपण सगळे घरात बंदिस्त झालो आहोत. आपल्या सगळ्यांना तणाव व बैचेनीचा सामना करावा लागतो आहे. काम, घर, नोकरी गेल्यामुळे आपला तणाव वाढत चालला आहे. याच कारणामुळे कित्येक लोकांचे मानसिक स्वास्थ्य बिघडत चालले आहे. पवित्र रिश्ता फंडचा हिस्सा बनून मी खूश आहे आणि पुढेही अशाच प्रकारच्या उपक्रमात सामील राहून खूश राहेन.

सुशांतला इंडस्ट्रीत एकता कपूरने लाँच केले होते. सुशांतने एकताच्या पवित्र रिश्ता मालिकेतून अभिनयाच्या कारकीर्दीला सुरूवात केली होती. यात सुशांतसोबत अंकिता लोखंडे मुख्य भूमिकेत होती. या शोने सुशांतला खूप लोकप्रियता दिली होती. मालिकेच्या सेटवर सुशांत, अंकिता व एकता यांच्यात खूप छान बॉण्डिंग झाली होती.

सुशांतच्या निधनाला एक महिना पूर्ण झाल्यानंतर एकताने भावनिक पोस्ट शेअर केली होती. एकताने सुशांत सोबतच्या फोटोंचा कोलाज बनवून शेअर केला होता आणि लिहिले की, देव, तुझ्या आत्म्यास शांती देओ सुशी. आम्ही नेहमी हसू आणि जेव्हा आकाशात शूटिंग स्टार पाहू तेव्हा विश मागू कारण मला माहिती आहे की तो शूटिंग स्टार तूच आहे. नेहमी तुझ्यावर प्रेम करत राहीन.

टॅग्स :एकता कपूरसुशांत सिंग रजपूत