Join us
Daily Top 2Weekly Top 5

'डंकी'चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित; शाहरुख आणि त्याचे 'उल्लू दे पट्ठे' प्रेक्षकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2023 11:38 IST

राजकुमार हिरानी दिग्दर्शित 'डंकी' सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

किंग खान शाहरुखच्या बहुप्रतिक्षित 'डंकी' सिनेमाची जोरदार चर्चा आहे. एकाच वर्षात तिसरा सुपरहिट सिनेमा देण्यासाठी शाहरुख सज्ज आहे.  राजकुमार हिरानी दिग्दर्शित सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या ट्रेलरचे नाव निर्मात्यांनी 'डंकी ड्रॉप ४' ठेवले आहे. 

२ मिनिटे १ सेकंदाच्या या ट्रेलरमध्ये हार्डी आणि त्याच्या मित्रांच्या छोट्याशा जगाचा रोलर कोस्टर राईड प्रवास पाहायाला मिळत आहे. ट्रेलरमध्ये शाहरुख आणि त्यांच्या मित्रांची गोष्ट दाखवण्यात आली आहे. ज्यांना लंडनला जाऊन आपल्या कुटुंबियांना चांगलं आयुष्य द्यायचं आहे.यासाठी ते इंग्रजी शिकण्यासाठी धडपड करू लागतात. ट्रेलरमध्ये अनेक रंजक गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत.

 'डंकी' म्हणजेच अनधिकृतपणे दुसऱ्या देशात प्रवेश करण्याची पद्धत यावर सिनेमा आधारित आहे. सिनेमात शाहरुख खानसोबतचतापसी पन्नू, विकी कौशल, बोमन इरानी यांचीही मुख्य भूमिका आहे. 'डंकी' हा चित्रपट २२ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.  या चित्रपटाचा ट्रेलर लोकांना खूप आवडला आहे. त्यानंतर निर्मात्यांना चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा आहेत.

२०२३ हे वर्ष शाहरुख खानसाठी सुरुवातीपासूनच चांगले राहिले आहे. वर्षाच्या सुरुवातीला 'पठाण' आणि नंतर 'जवान'ने बॉक्स ऑफिसवर धमाल केली. अशा परिस्थितीत  'डंकी' हा चित्रपट हिट झाला तर शाहरुखचा हा तिसरा बॅक टू बॅक हिट चित्रपट असणार आहे.  या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर प्रभासच्या 'सालार'शी टक्कर होणार आहे.

टॅग्स :शाहरुख खानबॉलिवूडसेलिब्रिटीतापसी पन्नूविकी कौशलराजकुमार हिरानी