Join us
Daily Top 2Weekly Top 5

दृष्टी धामीने 'या' मालिकेत केला दमदार डान्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2019 07:15 IST

कलर्सच्या गठबंधन मध्ये एक गँगस्टर आणि प्रामाणिक आयपीएस अधिकारी यांची प्रेमकथा दाखविण्यात आली आहे आणि त्यात आता गुढी पाडवा ट्रॅक पहायला मिळणार आहे.

ठळक मुद्देसोसायटीत गुढी पाडव्याच्या पूजेचे आयोजन करतात दृष्टी धामी सावित्रीची विशेष अतिथी बनून समारंभाची शोभा वाढविणार आहे

कलर्सच्या गठबंधन मध्ये एक गँगस्टर आणि प्रामाणिक आयपीएस अधिकारी यांची प्रेमकथा दाखविण्यात आली आहे आणि त्यात आता गुढी पाडवा ट्रॅक पहायला मिळणार आहे. सध्या चालू असलेल्या कथेत धनक (श्रुती शर्मा) गंभीर स्थितीतून बाहेर येऊ लागली आहे आणि तिचे कुटुंबिय चिंतेने तिच्या परत घरी येण्याची वाट पहात आहेत. धनकचे जीव वाचविण्यासाठी देवाचे आभार मानण्यासाठी कुटुंबातील सर्वजण त्यांच्या सोसायटीत गुढी पाडव्याच्या पूजेचे आयोजन करतात.

हा सण साजरा करण्यासाठी, लोकप्रिय अभिनेत्री दृष्टी धामी सावित्रीची विशेष अतिथी बनून समारंभाची शोभा वाढविणार आहे. गुलाबी आणि हिरव्या रंगाची नऊवारी साडी घातलेली, दृष्टीने पिंगा, फितूरी आणि सपनों में मिलती है सारख्या गाण्यांवर धनक आणि सावित्रीच्या सोबत दिमाखदार डान्स करणार आहे.

याबाबतबोलताना दृष्टी धामी म्हणाली, 'गठबंधनमध्ये गुढी पाडवाच्या समारंभात सामील होण्याचा मला आनंद झाला आहे कारण त्यात मला एका मराठी मुलगीची भूमिका करायला मिळणार आहे. नृत्य करणे मला नेहमीच आवडते आणि मालिेकेमध्ये जेव्हा मला त्यासाठी विचारले जाते तेव्हा मी ते नाकारू शकत नाही. मला आशा आहे की प्रेक्षकांना सुध्दा ते आवडेल, कलाकारांसोबत प्रसिध्द बॉलिवूड गाण्यांवर नृत्य करण्याचा मला अतिशय आनंद मिळाला आहे. मला सर्व कलाकार आणि कर्मचारी यांच्या सोबत खूप छान वेळ गेला आणि माझ्या सर्वांना शुभेच्छा.'

टॅग्स :दृष्टि धामीकलर्स