Join us
Daily Top 2Weekly Top 5

दृष्टी धामीने सांगितलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2024 16:17 IST

दृष्टी धामीने मुलीचं बारस केलं आहे.

दृष्टी धामी ही टेलिव्हिजनवरील सर्वांत लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. गेल्या काही वर्षांपासून दृष्टी मालिकांपासून दूर असली तरी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. गेल्या २२ ऑक्टोंबर रोजी तिला कन्यारत्न प्राप्त झालं. आता दृष्टीने तिच्या लाडक्या मुलीचं नाव सांगितलं.  सोशल मीडिया मुलीचा एक फोटो शेअर करत तिचं नावही सांगितलं आहे.

दृष्टी धामीने मुलीचं बारस केलं आहे. अभिनेत्रीने मुलीच्या पायांचा फोटो शेअर केला. "लीलाला सगळ्यांनी हॅलो म्हणा", असे लिहीत तिने मुलीच्या नावाची घोषणा केली आहे.  फोटोमध्ये चेहरा दिसत नसला तरी तिचे चिमुकले पाय कॅमेऱ्यात कैद करण्यात आले आहेत. तिच्या या पोस्टवर अनेक कलाकारांसोबत चाहत्यांनी कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत. 

लग्नाच्या 9 वर्षांनंतर दृष्टी धामी आई झाली.  दृष्टीने १४ जून रोजी गरोदर असल्याची घोषणा केली होती. नीरज व दृष्टी यांनी २०१५ साली लग्नबंधनात अडकले होते. वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर दृष्टी धामी व्हिव्हियन डेसेनसोबत 'मधुबाला' या टीव्ही सीरियलमुळे चर्चेत होती. ती शेवटची 'दुरंगा' या मालिकेत दिसली होती. तसेच ती 'सिलसिला बदलते रिश्तों का', 'गीत हुई सबसे पराई', 'एक था राजा एक थी रानी', 'परदेश में है मेरा दिल' सारख्या शोमध्ये दिसली आहे.

टॅग्स :दृष्टि धामीटेलिव्हिजन