Join us
Daily Top 2Weekly Top 5

सोनाक्षी सिन्हा-हुमा कुरैशीची 'डबल एक्सएल' जोडी, चित्रपटासाठी अभिनेत्रींनी केलं जबरदस्त बॉडी ट्रान्सफॉर्मेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2022 15:37 IST

सोनाक्षी सिन्हा आणि हुमा कुरैशी यांनी या चित्रपटासाठी जबरदस्त बॉडी ट्रान्सफॉर्मेशन केले आहे.

बॉडी शेमिंग, महिलांचा लठ्ठपणा आणि त्यावरील लोकांचा दृष्टिकोन यावर एक चित्रपट येतोय, 'डबल एक्सएल', ज्याचा टीझर रिलीज झाला आहे. या चित्रपटात सोनाक्षी सिन्हा आणि हुमा कुरैशी मुख्य भूमिकेत आहेत. टीझरमध्येच चित्रपटाच्या संकल्पनेची झलक दिली आहे आणि ती खूपच मजेदार आहे.या टीझरसह, निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. 

टीझरमध्ये हुमा कुरैशी आणि सोनाक्षी सिन्हा एका बाकावर बसून बोलताना दिसत आहेत.सोनाक्षी सिन्हा आणि हुमा कुरैशी यांनी या चित्रपटासाठी जबरदस्त बॉडी ट्रान्सफॉर्मेशन केले आहे, त्यांनी या चित्रपटासाठी चांगलेच वजनही वाढवले ​​आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत झहीर इक्बाल, महत राघवेंद्र दिसणार आहेत.

एका मुलाखतीत झहीर इक्बालने सांगितले होते की, या चित्रपटासाठी हुमा आणि सोनाक्षीने 15 ते 20 किलो वजन वाढवले ​​होते. यासाठी त्यांनी भरपूर खाल्लं आणि डाएटही वाढवला होता. 'डबल एक्सएल'हा चित्रपट 14 ऑक्टोबर 2022 रोजी सिनेमागृहात रिलीज होणार आहे. भारत आणि लंडनमध्ये या सिनेमाचे शूटिंग झालं आहे. 

 चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार आणि कृष्ण कुमार, विपुल डी शाह, राजेश बहल आणि अश्विन वर्दे, साकिब सलीम, हुमा कुरेशी आणि मुदस्सर अझीझ यांनी केली आहे. 

टॅग्स :सोनाक्षी सिन्हाहुमा कुरेशी