बॉलिवूडमधील ड्रामा क्वीन राखी सावंतने जेव्हापासून लग्न केलं आहे तेव्हापासून ती चर्चेचा विषय बनली आहे. वैवाहिक जीवन ती नवऱ्याशिवायच व्यतित करत आहे. खरेतर तिचा नवरा रितेश लंडनचा आहे. राखी सोशल मीडियावर कधी कधी उदास व रडतानाचे व्हिडिओ शेअर करत असते.
{{#allowed}} {{#config.logo.enabled}}
{{/config.logo.enabled}}
{{/allowed}}राखीने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात ती रडताना सांगत आहे की, तुम्ही जे सांगाला ते करेन. जे सांगाल ते ऐकेन, मात्र मला इग्नोर करू नको यार. मी राहू शकत नाही. तुम्हाला माझ्यावर अजिबात दया येत नाही आहे ना. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे.
याआधीदेखील राखी सावंतने एक डायलॉग व्हिडिओ शेअर केला होता. ज्यात ती बोलली की, एक महिला जगातील सर्वात मोठं दुःखदेखील झेलू शकते. पण, केव्हा हे तुम्हाला माहित आहे का, जेव्हा तिचा नवरा तिच्यासोबत असेल.
राखी सावंतचे हे व्हिडिओ फिल्टर्ड होतात. व्हायरल व्हिडिओत ती खरोखरची रडत नाही. मात्र एखादी नववधू जर रडतानाचा व्हिडिओ शेअर करत असेल तर लोक तर्कवितर्क लावणार हे साहजिकच आहे.राखी सावंत तिच्या नवऱ्याला खूप मिस करते आहे, हे तिच्या इंस्टा पोस्टमधून समजतं आहे. राखी सावंतचे चाहत्यांचं म्हणणं आहे की, राखीचं विवाहित जीवन सुरळीत नाही.
राखी सावंतच्या नवऱ्याला अद्याप कुणी पाहिलेलं नाही. अद्याप तिचा नवरा सीक्रेटच आहे. मात्र वधूच्या गेटअपमधील राखीचे फोटो सोशल मीडियावर पहायला मिळाले.
राखीचं यावर म्हणणं आहे की, तिचा नवरा रितेश लाजाळू आहे. त्याला मीडियापासून दूर रहायचं आहे. त्यामुळे तो अद्याप कॅमेऱ्यासमोर आलेला नाही.
राखी २९ सप्टेंबरला सुरू होणाऱ्या बिग बॉसच्या १३व्या सीझनच्या ग्रॅण्ड प्रीमियरला परफॉर्म करणार आहे. बिग बॉसमध्ये राखी पहिल्यांदा त्याच्या नवऱ्याला जगासमोर आणणार आहे. याचा खुलासा खुद्द राखीनं केला आहे.