Join us
Daily Top 2Weekly Top 5

'डॉक्टर डॉन' मालिकेने कोरोना पार्श्वभूमीवर घेतला मोठा निर्णय, वाचून तुम्हालाही वाटेल कौतुकास्पद

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2020 06:00 IST

'डॉक्टर डॉन' मालिकेने नुकताच १०० भागांचा यशस्वी टप्पा पार गाठला आहे. १०० भागांचा माईलस्टोन पार केल्यानंतर सेलिब्रेशन तर व्हायलाच हवं पण कोविड १९ महामारीच्या परिस्थितीत डॉक्टर डॉनच्या टीमने एक कौतुकास्पद निर्णय घेतला आहे.

'डॉक्टर डॉन' मालिकेने अल्पावधीत रसिकांची पसंती मिळवली. लोकप्रियतेचं शिखर गाठलेल्या 'डॉक्टर डॉन' या मालिकेला प्रेक्षकांनी सुरुवातीपासूनच पसंती दिली आहे. या मालिकेतील प्रत्येक व्यक्तीरेखा रसिकांच्या पसंतीस पात्र ठरली आहे. देवा भाईची हटके स्टाईल, त्याची भन्नाट गॅंग, डॉलीबाई आणि त्याची जुगलबंदी आणि मुलीसाठी मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊन त्या कॉलेजमध्ये देवा भाईने केलेला दंगा प्रेक्षकांच्या भलताच पसंतीस पडला आहे. या मालिकेतील प्रमुख भूमिकेतील देवा आणि डॉक्टर मोनिका ही पात्रं तर त्यांच्या मनात घरकरून बसली आहेत. सोशल मीडियाद्वारे देखील या कलाकारांवर प्रेक्षक आणि चाहते प्रेमाचा वर्षाव करतात.

या मालिकेने नुकताच १०० भागांचा यशस्वी टप्पा पार गाठला आहे. १०० भागांचा माईलस्टोन पार केल्यानंतर सेलिब्रेशन तर व्हायलाच हवं पण कोविड १९ महामारीच्या परिस्थितीत डॉक्टर डॉनच्या टीमने एक  कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. सध्याची परिस्थिति आणि इतर मालिकांच्या सेटवर नुकत्याच झालेल्या दुःखद घटनाच्या पार्श्वभूमीवर अतिशय समंजसपणे हा माईलस्टोन साजरा न करण्याचा योग्य निर्णय घेतला आहे.

देवा भाई म्हणजे देवदत्त नागे यांनी सांगितले, "प्रेक्षकांचं प्रेम आणि त्यांचा मालिकेला मिळणार प्रतिसाद हीच या संपूर्ण टीमसाठी त्यांच्या कामाची पावती आहे. त्यामुळे हि मालिका अशा प्रकारेच प्रेक्षकांचे मनोरंजन करत राहो आणि असे अनेक माईलस्टोन पुढे साजरे करत राहण्याची संधी वारंवार मिळत राहो अशी इच्छा आमची सम्पूर्ण  टीमची आहे."

'आई माझी काळुबाई' या मालिकेचं शूटिंग सातारामध्ये होत होते. त्यावेळी मुंबईतून एका डान्स ग्रुप तेथे चित्रीकरणासाठी गेला होता. त्यातून कोरोनाचा फैलाव झाल्याची शक्यता व्यक्त केली गेली. त्यामुळे चित्रीकरणादरम्यान दिवंगत ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांना कोरोनाची लागण झाली होती.त्यानंतर त्या व्हेंटिलेटरवर होत्या. त्यांच्या निधनानंतर मराठी चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. वयाच्या 79 व्या वर्षी त्यांचं निधन झालं. मालिकेच्या शूटिंगदरम्यान  27 जणांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. या मालिकेत अलका कुबल देवी काळूबाईची भूमिका साकारत आहेत. 

Also Read: अलका कुबल यांनाही वाहण्यात आली श्रद्धांजली, शेवटी व्हिडीओ शेअर करत सांगावे लागले......

Also Read: ‘शेवटचं सगळं तूच कर...’; आशालता यांची ही इच्छा अलका कुबल यांनी पूर्ण केली!

 

टॅग्स :देवदत्त नागे