कोरोना व्हायरसमुळे सगळीकडे लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे. या दरम्यान सेलिब्रेटींसोबत सामान्य लोकही घरात कैद आहेत. या लॉकडाउनमध्ये बरेच बॉलिवूडचे जुने किस्से वाचायला मिळत आहे. यादरम्यान सलमान खानची पहिली अभिनेत्री रेणू आर्याचे वृत्त वाचायला मिळत आहे.
रेणू आर्याने सलमान खानचा पदार्पणाचा चित्रपट बीवी हो तो ऐसी चित्रपटात काम केले होते. सलमान व रेणू या दोघांचा हा पहिला चित्रपट होता. या चित्रपटात रेखा व फारुख शेख मुख्य भूमिकेत होते. सलमान खानने अभिनेत्री रेखा यांच्या दीराची भूमिका साकारली होती.
बीवी हो तो ऐसी हा रेणू आर्याचा पहिला चित्रपट होता आणि तिने बंजारन, चाँदनी, सिंदूर और बंदूक आणि आतिशबाज या चित्रपटात काम केले आणि ती इंडस्ट्रीतून गायब झाली. रेणू 1991 साली बंजारन चित्रपटात झळकली होती. या चित्रपटात तिच्यासोबत श्रीदेवी व ऋषी कपूर मुख्य भूमिकेत होते. 29 वर्षांपासून ती गायब आहे.