Join us

'धडाकेबाज' चित्रपटातील 'गंगी फुलवाली' आठवतेय का?, आता दिसते खूप ग्लॅमरस

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2021 07:00 IST

१९९० साली 'धडाकेबाज' चित्रपट प्रदर्शित झाला.

१९९० साली 'धडाकेबाज' चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश कोठारे यांनी केले आहे. हा चित्रपट तमीळ चित्रपटाचा वेत्री पडिगलचा रिमेक आहे. या चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे, दीपक शिर्के, प्राजक्ता कुलकर्णी, अश्विनी भावे आणि रविंद्र बेर्डे हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटातील सर्व पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या चित्रपटातील गंगी फुलवाली आठवते आहे ना. ही भूमिका अभिनेत्री प्राजक्ता कुलकर्णीने साकारली होती. आता ही अभिनेत्री खूप ग्लॅमरस दिसते. 

प्राजक्ता कुलकर्णी मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने १९९० साली धडाकेबाज चित्रपटातून पदार्पण केले आहे. तिने गंगी फुलवालीची भूमिका केली आहे. धडाकेबाज चित्रपटाची कथा लक्ष्या, महेश आणि बाप्पा या तीन मित्रांभोवती फिरते. या चित्रपटातील या तिन्ही पात्रांसोबत गंगी फुलवाली, हवालदार रेडे, उमा जाधव या पात्रांनीदेखील प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले होते. या चित्रपटातून अभिनेत्री प्राजक्ता कुलकर्णी घराघरात पोहचली. या चित्रपटातील तिच्या कामाचे खूप कौतुक झाले.

धडाकेबाज या चित्रपटांव्यतिरिक्त तिने १९८९ साली गुंज चित्रपटात छोटीशी भूमिका केली होती. प्राजक्ता कुलकर्णी शोध, आग, दामिनी आणि धडाकेबाज चित्रपटातील भूमिकेसाठी ओळखली जाते.

प्राजक्ता कुलकर्णी सोनी मराठी वाहिनीवरील आई माझी काळूबाई मालिकेत काम केले होते. 

टॅग्स :महेश कोठारेलक्ष्मीकांत बेर्डे