Join us

कॅमेऱ्याकडे बघून क्युट स्माईल देणाऱ्या या मुलीला ओळखलंत का? आज मराठी इंंडस्ट्रीवर गाजवतेय राज्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2022 12:52 IST

फोटोत कॅमेऱ्याकडे बघून  क्युट स्माईल देणारी ही मुलगी आज मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे.

सध्या सोशल मीडियावर बालपणीच्या फोटोंचा ट्रेंड पाहायला मिळतो. या ट्रेंडमध्ये सेलिब्रेटी मंडळीदेखील सामील झाले आहेत. बॉलिवूड असो किंवा मराठी सिनेइंडस्ट्री, सेलिब्रेटींनी देखील त्यांच्या बालपणींचे फोटो शेअर करताना दिसतात आणि आपल्या आठवणींना उजाळा देताना दिसतात. दरम्यान मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रीचा बालपणीचा सोशल मीडियावर व्हायरल होतोय. फोटोत कॅमेऱ्याकडे बघून  क्युट स्माईल देणारी ही मुलगी आज मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे.

ही मुलगी दुसरी तिसरी कुणी नसून श्रेया बुगडे आहे. श्रेया सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे. श्रेया बुगडे तिच्या इन्स्टा अकाऊंटवर नेहमीच स्वत: आणि कुटुंबासोबतचे फोटो शेअर करत असते. श्रेयाने तिच्या लहानपणीचा फोटो इन्स्टावर शेअर केला आहे. स्वतःचे अनेक ग्लॅमरस फोटो ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. याशिवाय अनेक ट्रेंडिंग रिल्सही ती चाहत्यांसोबत शेअर करताना पाहायला मिळते.

कॉमेडीचं अचूक टायमिंग आणि आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर आज अभिनेत्री श्रेया बुगडे (Shreya Bugde) घराघरात लोकप्रिय झाली आहे. चला हवा येऊ द्या(Chala Hawa Yeu Dya)नं श्रेयाला फक्त ओळखचं मिळवून दिलेली नाही तर तिला प्रसिद्धीच्या शिखरावर देखील पोहचवले आहे. त्यामुळे तिचा चाहतावर्ग फक्त भारतातच नाही तर जगभरात आहे.  

टॅग्स :श्रेया बुगडेचला हवा येऊ द्या