Join us
Daily Top 2Weekly Top 5

'चंद्रविलास' मालिकेतील हॉरर लूकमधल्या 'या' अभिनेत्याला ओळखलंत का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2023 15:45 IST

Chandravilas: सोशल मीडियावर सध्या या मालिकेतील भूताची प्रचंड चर्चा रंगली आहे. पाहताच क्षणी भीती वाटणारा असा लूक या अभिनेत्याने केला असून तो नेमका कोण असेल हा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.

झी मराठीवर (Zee Marathi ) सध्या अनेक मालिकांचा रेलचेल पाहायला मिळत आहे. या मालिकांच्या यादीत आता अनेक नवीन मालिका येऊ घातल्या आहेत. त्यातलीच एक मालिका म्हणजे चंद्रविलास.  हॉरर जॉनर असलेल्या या मालिकेचे काही प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. त्यामुळे या मालिकेविषयीची प्रेक्षकांची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत आहे. यामध्येच मालिकेत दाखवण्यात आलेल्या आत्म्याची म्हणजेच आत्म्याची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याची चर्चा होत आहे. ही हॉरर भूमिका नेमकी कोणत्या अभिनेत्याने साकारली आहे हा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.

सोशल मीडियावर सध्या या मालिकेतील भूताची प्रचंड चर्चा रंगली आहे. पाहताच क्षणी भीती वाटणारा असा लूक या अभिनेत्याने केला असून तो नेमका कोण असेल हा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. या प्रश्नाचं उत्तर नुकतंच समोर आलं आहे. ही भूमिका मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्याने साकारली आहे.मुलगी आणि वडील यांची कथा उलगडणाऱ्या चंद्रविलास या मालिकेत अभिनेता वैभव मांगले याने भूताची भूमिका साकारली आहे. विशेष म्हणजे त्याचा हा नवा लूक पाहून त्याला ओळखणंही कठीण झालं आहे.

काय आहे मालिकेची कथा?

या मालिकेत गोष्ट आहे ‘चंद्रविलास’ या दोनशे वर्षांपूर्वीच्या वास्तूची आणि त्यात अडकलेल्या बाप-लेकीची. अनंत महाजन आणि त्याची मुलगी शर्वरी गावातल्या एका जुन्या वाड्यात जातात आणि तिथे अडकून पडतात. ते दोघं तिथे पोहोचल्यापासून अनाकलनीय घटनांची एक मालिकाच सुरू होते. या घटनांमागे असतं, ते या वास्तूत गेल्या दोनशे वर्षांपासून वास्तव्याला असलेला एक आत्मा. त्या आत्म्याला नेमकं काय हवंय, त्यानं कोणत्या उद्देशानं या दोघा वडील-मुलीला त्या वाड्यात अडकवून ठेवलंय, त्याचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तो आत्मा कोणकोणत्या गोष्टी घडवून आणणार आहे,

या सगळ्या दरम्यान त्यांना आणखी कोण-कोण भेटणार आहे आणि त्या आत्म्याच्या तावडीतून सुटण्यासाठी त्या दोघांना कोणत्या दिव्यातून जावं लागणार आहे, ह्या सगळ्याचा उलगडा या मालिकेतून होणार आहे. या मालिकेचं लेखन समीर गरुड आणि प्रसाद जोशी यांनी केलं आहे. 

टॅग्स :वैभव मांगलेटेलिव्हिजनसेलिब्रिटी