Join us

रेखा यांच्या कुशीत असलेल्या मुलीला ओळखलंत का? अक्षय कुमारसोबत केलंय काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 16:50 IST

अभिनेत्री रेखा (Bollywood Actress Rekha) यांचा एका गोंडस बाळाला मांडीवर घेतलेला एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रेखाच्या मांडीवर दिसणारी ही मुलगी आज बॉलिवूड स्टार बनली आहे.

बॉलिवूडची अभिनेत्री रेखा (Bollywood Actress Rekha) यांचा एका गोंडस बाळाला मांडीवर घेतलेला एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रेखाच्या मांडीवर दिसणारी ही मुलगी आज बॉलिवूड स्टार बनली आहे. या अभिनेत्रीने तिच्या ६ वर्षांच्या कारकिर्दीत तीन हिट चित्रपट दिले आहेत आणि ओटीटीवरही धुमाकूळ घातला आहे. चला जाणून घेऊया ती कोण आहे?

रेखा यांच्या मांडीवर दिसणारी ही गोंडस मुलगी दुसरी तिसरी तिसरी कोणी नसून अनन्या पांडे आहे. चंकी पांडेंची मुलगी अनन्या ही बॉलिवूडच्या तरुण पिढीतील एक टॅलेंटेड अभिनेत्री आहे. तिने अनेक चित्रपटात काम केले आहेत आणि तिच्या उत्तम अभिनयाने तिने स्वतःला सिद्ध केले आहे. रेखा यांनी अलीकडेच त्यांच्या पुन्हा प्रदर्शित झालेल्या उमराव जान चित्रपटाच्या स्क्रीनिंगचे आयोजन केले होते. तेव्हा अनन्या पांडे देखील एका सुंदर लूकमध्ये दिसली.

अनन्याने शेअर केला रेखा यांच्यासोबतचा फोटो

अनन्या पांडेने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर उमराव जानच्या स्क्रीनिंगचे अनेक फोटो शेअर केले आहेत. तिने या ज्येष्ठ अभिनेत्रीसोबतचा एक बालपणीचा फोटोही शेअर केला आहे. ज्यामध्ये ती तिच्या मांडीवर बसलेली दिसत आहे. या फोटोमध्ये रेखा काळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या पोशाखात खूपच सुंदर दिसत आहे. तर बेबी अनन्या देखील निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये खूपच गोंडस दिसत आहे. रेखा अनन्याला मांडीवर घेऊन मनापासून हसताना दिसत आहे.

अनन्या पांडेने तिचा आणखी एक बालपणीचा फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती रेखाच्या पोर्ट्रेटसह गुलाबी ड्रेस परिधान करताना दिसत आहे. हे फोटो शेअर करताना अनन्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, "रे आंटीसाठी स्वाइप करा आणि पहा काहीही कसे बदलले नाही. उमराव जान सिनेमा."

वर्कफ्रंटअनन्या पांडेने स्टुडंट ऑफ द इअरमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिने पती पत्नी और वो, ड्रीम गर्ल २, गेहराईयांसारख्या चित्रपटात काम केले आहे. अलिकडेच ती अक्षय कुमार आणि आर माधवन यांच्यासोबत 'केसरी चॅप्टर २' या ऐतिहासिक नाटकात एका वकिलाच्या भूमिकेत दिसली. चित्रपटातील तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. अनन्याच्या सीटीआरएलचेही खूप कौतुक झाले.

टॅग्स :रेखाअनन्या पांडे